ENG vs PAK: १० पैकी १०! पाकिस्तानच्या फिरकीपटूंची कमाल, इंग्लंडच्या खेळाडूंनी Sajid Khanसमोर टेकले गुडघे
ENG vs PAK 3rd Test Match: पाकिस्तान-इंग्लंड कसोटी मालिकेतील अंतिम सामन्याला आजपासून सुरूवात झाली. पाकिस्तानमधील रावळपिंडी क्रिकेट मैदानावर हा सामना खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण रावळपिंडीच्या संथ खेळपट्टीवर पाकिस्तानच्या फिरकीपटूंसमोर इंग्लंडच्या फलंदाजांचा फार काळ निभाव लागू शकला नाही. साजिद खानने कमाल करून दाखवली आणि इंग्लंडचा निम्मा संघ माघारी पाठवला. त्याला नोमान अली व झहीद महमूदची साथ मिळाली व दोघांनी पाकिस्तानचा डाव २६७ धावांवर आटपला.
इंग्लंडकडून सलामीसाठी आलेल्या झॅक क्रॉली व बेन डकेटने सामन्याची सकारात्मक सुरूवात केली. १३ व्या षटकात नोमान अलीने झॅक क्रॉलीला माघारी पाठवले आणि इंग्लंडला ५६ धावांनर पहिला झटका मिळाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ऑली पॉप व जो रूटला साजिद खानने स्वस्तात बाद केले. सलामीवीर बेन डकेटचे अर्धशतक पुर्ण होताच नोमान अलीने त्याला ५२ धावांवर पायचीत केले.
त्यानंतर साजिद खानने पुन्हा आपल्या फिरकीने हॅरी ब्रुक व बेन स्टोक्सला फसवले व त्यांना मागोमाग तंबुत परतावले. ९८ व ५ बाद अशी इंग्लंडची बिकट परिस्थिती झालेली. पण सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या जेमी स्मिथने इंग्लंडची खेळी सावरण्यास सुरूवात केली. त्याला गस अटकिंसनची साथ मिळाली व दोघांनी ७ व्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली. पण, ६०व्या षटकात गस अटकिंसन बाद झाला आणि त्यांची भागीदारी तुटली.
पुढे ६२ व्या षटकात जेमी स्मिथ झेलबाद झाला आणि ११ धावांनी त्याचे शतक हुकले. स्मिथने ५ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ८९ धावांचे योगदान दिले. त्यानंतर इंग्लंडचा डाव घसरला व पहिल्या डावात २६७ धावांवर इंग्लंडला समाधान मानावे लागले.
मागच्या सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात तब्बल ७ विकेट्स घेणाऱ्या साजिद खानने या सामन्यातही कमाल करून दाखवली. साजिदला यावेळी इंग्लंडचा निम्मा संघ (६) बाद करण्यात यश आले. त्याचबरोबर नोमान अलीने ३ , तर झहीद महमूदने १ विकेट घेतला.
प्रत्युत्तरात उतरलेल्या पाकिस्तानने पहिल्या दिवसाअंती ३ विकेट्स गमावून ७३ धावा धावफलकावर लावल्या. ज्यामध्ये अब्दुल्ला शफिक (१४), सईम आयुब (१९) व कामरान घुलामने (३) अशी कामगिरी केली. तर कर्णधार शान मसुद व साऊद शकील प्रत्येकी १६ धावांवर नाबाद आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.