'Root' मजबूत! इंग्लंडच्या फलंदाजाचे दमदार शतक; विराट, रोहितसह मोडले अनेकांचे विक्रम

Joe Root Century in Test: इंग्लंडचा फलंदाज जो रूट याने पुन्हा एकदा संघासाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याने शतक झळकावले आणि विराट कोहली, रोहित शर्मा यांना मागे टाकले.
Joe Root Century
Joe Root Centuryesakal
Updated on

England vs Sri Lanka 2nd Test Joe Root: इंग्लंड-श्रीलंका यांच्यातली दुसरी कसोटी लॉर्ड्सवर सुरू आहे. पुन्हा एकदा जो रूटने खणखणीत शतक झळकावून इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले. २ बाद ४२ अशी धावसंख्या असताना जो रूट फलंदाजीला आला आणि त्याने मैदान गाजवले. सलामीवीर बेन डकेट ४० धावांवर माघारी परतला. हॅरी ब्रुक ( ३३) व जॅमी स्मिथ ( २१) यांनीही रूटला साथ दिली. रुटने संघाला ८२ षटकांत ७ बाद ३२२ धावांपर्यंत पोहोचवले. त्याने २०६ चेंडूंत १८ चौकारांसह १४३ धावा केल्या.

Joe Root Century
Joe Root Centuryesakal

इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी धावा..

जो रूटने शतकी खेळीसह इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला. रूटने ६५७७* धावा करताना एलिस्टर कूकचा ६५६८ धावांचा विक्रम मोडला. त्यानंतर ग्रॅहम गूच ( ५९१७), माइल एथर्टन ( ४७१६) व एलेक स्टीवर्ट ( ४६५०) यांचा क्रम येतो.

Joe Root Century
Joe Root Centuryesakal

कसोटी क्रिकेटमध्ये ५०+धावा

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०+धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये जो रूट ( ९७) पाचव्या क्रमांकावर सरकला आहे. त्याने शिवनरीन चंद्रपॉलचा ( ९६) विक्रम मोडला. सचिन तेंडुलकर ( ११९), जॅक कॅलिस ( १०३), रिकी पाँटिंग ( १०३) व राहुल द्रविड ( ९९) हे रूटच्या पुढे आहेत.

जो रूट तिसरा..

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये जो रूट ( ६५) तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. सचिन तेंडुलकर ६८ ( ३२९ इनिंग्ज) व चद्रपॉल ६६ ( २८० इनिंग्ज) हे रूटच्या ( २६३) पुढे आहेत.

लॉर्ड्सवर सर्वाधिक शतकं

क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर सर्वाधिक कसोटी शतक झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये जो रूटने ( ६) ग्रॅहम गूच व मिचेल वॉन यांच्याशी बरोबरी केली. त्याने एंड्य्रू स्ट्रॉस व केव्हीन पीटरसन ( ५) यांना मागे टाकले.

कसोटी क्रिकेटमध्ये फॅब फोअरमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम रूटच्या नावावर झाला आहे. त्याने न्यूझीलंडचा केन विलियम्सन व ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ( ३२) यांना मागे टाकले. विराट कोहली २९ शतकांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं...

जो रूटने कसोटीत ३३ आणि वन डेत १५ शतकं झळकावली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट कोहलीनंतर ( ८०) जो रूटचा ( ४९) क्रमांक येतो. त्याने रोहित शर्माला ( ४८) मागे टाकले.

Joe Root Century
Joe Root Centuryesakal

जलद ३३ शतकं...

जो रूटने १४५ कसोटी सामन्यांत ३३ शतकं झळकावली आहेत आणि राहुल द्रविड ( १५४) व एलिस्टर कूक ( १६१ ) यांचा विक्रम मोडला. रिकी पाँटिंग ( १०७ ), युनूस खान ( १०९) हे आघाडीवर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()