ENG vs SL 3rd Test : Ollie Pope seven hundreds : इंग्लंड-श्रीलंका यांच्या मालिकेतील तिसरी आणि शेवटची कसोटी आजपासून सुरू झाली. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. डॅन लॉरेन्स ( ५) १०व्या षटकात लाहिरू कुमाराच्या गोलंदाजीवर बाद झाला. मागील कसोटीत दोन्ही डावांत शतकी खेळी करणारा जो रूट ( १३) आज अपयशी ठरला आणि कुमाराने त्याची विकेट मिळवून दिली. पण, सलामीवीर बेन डकेट व कर्णधार ऑली पोप यांनी जोरदार प्रहार केला. पोपने जगात आतापर्यंत कुणालाच न जमलेला विक्रम नावावर केला.
बेन डकेट व पोप यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. मिलन रथनायके याने ही जोडी तोडली. बेन डकेट ७९ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ८६ धावांवर झेलबाद झाला. पोप व रूट यांनी अर्धशतकी भागीदारी केली खरी, परंतु यावेळी श्रीलंकेने रूटला जम बसण्याआधीच उखडून फेकले. पोप मैदानावर उभा राहिला आणि त्याने १०३ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह १०३ धावा करून दिवसअखेर खिंड लढवली. इंग्लंडने पहिल्या दिवसअखेर ४४.१ षटकांत ३ बाद २२१ धावा केल्या आहेत.
ऑली पोपचे हे सातवे कसोटी शतक ठरले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानी ही सात शतकं सात वेगवेगळ्या संघांविरुद्ध झळकावली आहेत. कसोटी क्रिकेट इतिहासात कारकीर्दिची पहिली सात शतकं सात वेगवेगळ्या देशांविरुद्ध झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला.
१३५* वि. दक्षिण आफ्रिका
१४५ वि. न्यूझीलंड
१०८ वि. पाकिस्तान
२०५ वि. आयर्लंड
१९६ वि. भारत
१२१ वि. वेस्ट इंडिज
१०३* वि. श्रीलंका
३१ - मार्क रामप्रकाश
१२ - ऑली पोप
११ - रोरी बर्न्स व जॉनथन बॅट्टी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.