ENG vs WI: बापरे! विंडीजच्या फलंदाजानं मारलेल्या सिक्सनं छतचं तोडलं, तुकडे पडले प्रेक्षकांच्या अंगावर, पाहा Video

Shamar Joseph smashes roof with six: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडीजच्या फलंदाजाने ठोकलेल्या एका षटकाराने स्टेडियमचे छतच तुटले आणि त्याचे तुकडे प्रेक्षकांच्या अंगावर पडल्याची घटना घडली.
Shamar Joseph smashed six on roof of Trent Bridge
Shamar Joseph smashed six on roof of Trent BridgeSakal
Updated on

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज संघात नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रीज येथे कसोटी मालितील दुसरा सामना १८ जुलैपासून सुरू झाला आहे. याच सामन्यादरम्यान वेस्ट इंडीजच्या फलंदाजाने मारलेल्या षटकाराने स्टेडियमच्या छताचे नुकसान झाल्याची घटना घडली.

ही घटने वेस्ट इंडीजच्या पहिल्या डावातील १०७ व्या षटकात घडली. या षटकात गस ऍटकिन्सन गोलंदाजी करत होता. या षटकात वेस्ट इंडिजकडून ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या शामर जोसेफने दुसऱ्या चेंडूवर डीप मिडविकेटला षटकार मारला. त्यानंतर त्याने चौथ्या चेंडूवरही आक्रमकता दाखवत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार मारला. त्यावेळी चेंडू स्टेडियमच्या छताला लागला. त्यामुळे छतावरील काही कौलं घरंगळत खाली आली, खाली बसलेल्या प्रेक्षकांच्या अंगावर पडली. सुदैवानं कोणालाही फारशी दुखापत झाली नाही.

दरम्यान, जोसेफने नंतर आणखी एक चौकार मारला आणि या षटकात एकूण १६ धावा चोपल्या.

या सामन्यात जोसेफने २७ चेंडूत ३३ धावांची खेळी केली. तत्पुर्वी कावेम हॉजने १२० धावांची खेळी केली. तसेच जोशुआ डी सिल्वाने नाबाद ८२ आणि ऍलिक एथनाथने ८२ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने ४८ धावा केल्या. त्यामुळे वेस्ट इंडीजने पहिल्या डावात १११.५ षटकात सर्वबाद ४५७ धावा केल्या आणि ४१ धावांची आघाडी घेतली.

इंग्लंडकडून या डावात गोलंदाजी करताना ख्रिस वोक्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर ऍटकिन्सन आणि शोएब बाशिर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर मार्क वूड आणि कर्णधार बेन स्टोक्स यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.

तत्पुर्वी इंग्लंडने पहिल्या डावात ८८.३ षटकात सर्वबाद ४१६ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून ऑली पोपने १२१ धावांची शतकी खेळी केली. तसेच बेन डकेटने ७१ आणि बेन स्टोक्सने ६९ धावांची अर्धशतकी खेळी केली.

वेस्ट इंडीजकडून गोलंदाजी करताना अल्झारी जोसेफने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच जेडन सिल्स, केविन सिनक्लेर आणि कावेम हॉज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. शामर जोसेफने १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.