ENG vs WI, Test: अँडरसन युगाचा शेवट अन् नव्या स्टारचा उदय; 90 वर्ष इंग्लंडच्या गोलंदाजाला जे नव्हते जमले ते पठ्ठ्याने केले

Gus Atkinson 12 Wickets: एकीकडे जेस्म अँडरसन निवृत्त होत असतानाच इंग्लंडच्या २६ वर्षीय वेगवान गोलंदाजाने पदार्पणातच १२ विकेट्स घेत क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधलंय.
James Anderson - Gus Atkinson | England Cricket Team
James Anderson - Gus Atkinson | England Cricket TeamSakal
Updated on

England vs West Indies Lords Test: एकीकडे जेस्म अँडरसन निवृत्त होत असतानाच इंग्लंडच्या एका २६ वर्षीय वेगवान गोलंदाजाने क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. गस ऍटकिन्सन असं त्याचं नाव असून त्याने पहिलाच कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळताना मोठा कारनामा केला आहे.

लॉर्ड्सवर इंग्लंडने शुक्रवारी (१२ जुलै) वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि ११४ धावांनी विजय मिळवला. हा सामना ऍटकिन्सनचा पदार्पणाचा कसोटी सामना होता, तर जेस्म अँडरसनचा कारकि‍र्दीत १८८ वा आणि अखेरचा कसोटी सामना होता.

ऍटकिन्सन या सामन्यात इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने या सामन्यात पहिल्या डावात १२ षटकात ४५ धावा खर्च करताना ७ विकेट्स घेतल्या. तसेच दुसऱ्या डावात १४ षटकात ६१ धावा खर्च करताना त्याने ५ विकेट्स घेतल्या, म्हणजेच दोन्ही डावात मिळून त्याने १२ विकेट्स घेतल्या आहेत.

James Anderson - Gus Atkinson | England Cricket Team
James Anderson: शेवटच्या सामन्यात लेकींना लॉर्ड्सवर मिळालेला मोठा मान पाहून अँडरसनचे डोळेही पाणावले, पाहा Video

इंग्लंडचा नवा स्टार

कसोटी पदार्पणाच्या सामन्यात दोन्ही डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा गस ऍटकिन्सन इंग्लंडचा ९० वर्षातील म्हणजेच १९३२ नंतरचा पहिलाच गोलंदाज आहे. तसेच १९७२ पासून असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच वेगवान गोलंदाज आहे. यापूर्वी १९७२ साली ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज बॉब मस्सी यांनी लॉर्ड्सवरच पदार्पणात इंग्लंडविरुद्ध दोन्ही डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या.

इतकेच नाही, तर ऍटकिन्सन कसोटी पदार्पणात सर्वोत्तम गोलंदाजी करणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजही ठरला आहे. त्याच्यापूर्वी बॉब मेस्सीने १९७२ मध्ये १३७ चेंडूत १६ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच फ्रेड मार्टिनने १८९० साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०२ चेंडूत १२ विकेट्स घेतल्या.

James Anderson - Gus Atkinson | England Cricket Team
Video: 21 वर्ष, 188 कसोटी अन् 704 विकेट्स! James Anderson ची निवृत्ती, इंग्लंडकडून विजयाची भेट

कसोटी पदार्पणात सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन

  • 16/137 - बॉब मस्सी (ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड, लॉर्ड्स, १९७२)

  • 12/102 - फ्रेड मार्टिन (इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, द ओव्हल, १८९०)

  • 12/106 - गस ऍटकिन्सन (इंग्लंड वि. वेस्ट इंडिज, लॉर्ड्स, २०२४)

इंग्लंडसाठी कसोटी पदार्पणात सर्वोत्तम गोलंदाजी

  • 13/91 - जॉन फेरीस (वि. दक्षिण आफ्रिका, केप टाऊन, १८९२)

  • 12/102 - फ्रेड मार्टिन (वि. ऑस्ट्रेलिया, द ओव्हल, १८९०)

  • 12/106 - गस ऍटकिन्सन (वि. वेस्ट इंडीज, लॉर्ड्स, २०२४)

  • 11/96 - चार्ल्स मॅरियट (वि. वेस्ट इंडीज, द ओव्हल, १९३३)

  • 11/145 - ऍलेक बेडसर (वि. भारत, लॉर्ड्स, १९४६)

Chitra smaran:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com