Cricketer Retirement: 'माझी ऑस्ट्रेलियाविरुद्ध निवड झाली नाही अन्...', दिग्गज अष्टपैलूने अचानक घेतली निवृत्ती

Moeen Ali Retirement: आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी निवड न झाल्यानंतर आता अष्टपैलू क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनच निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
England Team
England TeamSakal
Updated on

England Allrounder Moeen Ali Retired: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने एका मुलाखतीत त्याच्या निवृत्तीमागील कारणही स्पष्ट केले.

मोईन अलीने डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की 'मी आता ३७ वर्षांचा आहे आणि या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकांसाठी माझी इंग्लंड संघात निवड झालेली नाही. मी इंग्लंडसाठी खूप क्रिकेट खेळलोय. आता पुढच्या पिढीची वेळ आहे, हेच मलाही समजवण्यात आले. मलाही ते योग्य वाटले. मी माझे योगदान दिली आहे.'

मोईन अलीने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने ६८ कसोटी, १३८ वनडे आणि ९२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत २०४ विकेट्स, वनडेत १११ विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ५१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने तिन्ही प्रकारात मिळून ८ शतकांसह ६६७८ धावा केल्या आहेत.

England Team
Shikhar Dhawan Retirement: 'मोहालीत तू मला रिप्लेस केलं अन्...', शिखरसाठी सेहवागची ती पोस्ट चर्चेत; गंभीर-रैनाही झाले व्यक्त
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.