England Cricket Board: इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स आयपीएल ऑक्शनमध्ये सहभाग घेणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचे व्यग्र वेळापत्रक आणि कसोटी क्रिकेटला प्राधान्य देण्यासाठी बेन स्टोक्स आयपीएल खेळणार नसल्याची बातमी समोर आली. अशातच इंग्लंडने आज २०२४-२५ साठी केंद्रीय करार यादी जाहीर केली. ज्यामध्ये यापुर्वी एका वर्षासाठी कररारबद्ध असणाऱ्या बेन स्टोक्सचा करार दोन वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे.
नवीन बहु-वर्षीय प्रणाली अंतर्गत यावेळी पाच खेळाडूंना पहिला इंग्लंडचा केंद्रीय करार मिळाला आहे. एकूण २९ खेळाडूंना इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून करारबद्ध करण्यात आले आहे. ज्यामध्ये ७ खेळाडूंना दोन वर्षाचा करार मिळाला, १९ खेळाडूंना वार्षिक करार आणि ३ खेळाडूंना विकास कराराअंतर्गत करारबद्ध करण्यात आले.
दोन वर्षांचा केंद्रीय करार देण्यात आलेल्या ७ खेळाडूंमध्ये इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आणि मर्यादित षटकांचा कर्णधार जॉस बटलर यांचा समावेश आहे. यापुर्वी बेन स्टोक्स एका वर्षासाठी करारबद्ध होता. पण, आता त्याचा करार दोन वर्षांसाठी वाढवला आहे. दोन वर्षांच्या कराराच्या यादीत समाविष्ट असलेल्या इतर खेळाडूंमध्ये इंग्लंडचा आघाडीचा कसोटी फलंदाज जो रूट, उदयोन्मुख फलंदाज हॅरी ब्रूक, तसेच गस अटकिंसन, जेमी स्मिथ आणि मार्क वुड यांचा समावेश आहे.
जेमी स्मिथ, विल जॅक्स, शोएब बशीर, फिल सॉल्ट आणि ऑली स्टोन यांना प्रथमच नवीन बहु-वर्षीय प्रणाली अंतर्गत इंग्लंडचा केंद्रीय करार मिळाला आहे. या ५ खेळाडूंना प्रत्येकी एक वर्षाचा करार देण्यात आला आहे. तर, जॉन टर्नर, जेकब बेथेल आणि जोश हल यांनीही प्रथमच विकास करार मिळवला आहे.
गस अटकिंसन, हॅरी ब्रूक, जॉस बटलर, जो रूट, जेमी स्मिथ, बेन स्टोक्स, मार्क वुड.
रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, शोएब बशीर, ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, सॅम करन, बेन डकेट, विल जॅक्स, जॅक लीच, लियाम लिव्हिंगस्टोन, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट, ऑली स्टोन, जोश टंग, रीस टोपली, ख्रिस वोक्स.
जेकब बेथेल, जोश हल, जॉन टर्नर.
केंद्रीय करार यादीच्या घोषणेवर बोलताना, इंग्लंड पुरुष क्रिकेटचे संचालक, रॉब की म्हणाले, " करारबद्ध केलेल्या खेळाडूंकडे कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कौशल्य आहेत. संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास असलेल्या खेळाडूंना हे करार देण्यात येतात. आमचे दोन्ही कर्णधार, बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी दोन वर्षांच्या केंद्रीय करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यांनी देशासाठी खेळण्याला प्राधान्य दिले आहे. तसेच, नवीन केंद्रीय करारावर स्वाक्षरी केलेल्या सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करू इच्छितो."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.