Ind vs Eng : पाचव्या कसोटीसाठी संघाची घोषणा! खेळपट्टीचा रंग पाहून केला मोठा बदल

England playing XI for 5th Test against India : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे 7 मार्चपासून खेळला जाणार आहे.
England announce playing XI for 5th Test against India News Marathi
England announce playing XI for 5th Test against India News Marathi sakal
Updated on

England announce playing XI for 5th Test against India : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे 7 मार्चपासून खेळला जाणार आहे. यासाठी दोन्ही संघ पोहोचले आहेत.

दरम्यान, सामन्याला अजून एक दिवस बाकी असतानाही इंग्लंडने आपले प्लेइंग इलेव्हन जाहीर केले आहे. संघात फक्त एक बदल करण्यात आला आहे. इंग्लंड संघ पुन्हा दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.

England announce playing XI for 5th Test against India News Marathi
Ind vs Eng R Ashwin : “मी इतके फोन केले पण...” 100 व्या कसोटीआधी माजी खेळाडूने अश्विनवर केले गंभीर आरोप

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाचव्या टेस्टमध्ये पुन्हा एकदा फिरकीपटूंचा दबदबा पाहायला मिळू शकतो. सध्या धरमशालातील हवामान खराब आहे. पुढील काही दिवस तेथे पाऊस पडू शकतो. काही दिवसाआधी पाऊस पडला होता त्यानंतर खेळपट्टी तपकिरी रंगाची दिसत होती.

एवढेच नाही तर अवकाळी पावसामुळे क्युरेटरला खेळपट्टीवर फारसे काम करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे संथ टर्निंग विकेटमुळे इंग्लंडला पुन्हा एकदा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे धरमशाला कसोटीसाठी इंग्लंडने एक दिवस अगोदरच आपल्या अकरा खेळाडूंची घोषणा केली आहे. आणि संघात बदल केला आहे, चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार ओली रॉबिन्सनला शेवटच्या कसोटी सामन्यातून बाहेर गेला होता. त्याच्या जागी पुन्हा एकदा मार्क वुडचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे.

England announce playing XI for 5th Test against India News Marathi
Ind vs Eng R Ashwin : “मी इतके फोन केले पण...” 100 व्या कसोटीआधी माजी खेळाडूने अश्विनवर केले गंभीर आरोप

उर्वरित संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग तीन सामने गमावून इंग्लंड संघाने मालिका गमावली आहे. पुढचा सामना जिंकणे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पहिल्या दिवशी पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीत इंग्लंडचा संघ तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरेल, अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. सध्या धरमशालामधील हवामान वेगवान गोलंदाजांना मदत करत आहे. यावेळीही फिरकी गोलंदाजीची जबाबदारी टॉम हार्टली, शोएब बशीर आणि जो रूट सांभाळतील.

England announce playing XI for 5th Test against India News Marathi
Indian Blind Cricket : पाकिस्तान मदत करते मग BCCI का नाही? अंध क्रिकेट संघाला हवा टीम इंडिया सारखा करार

धरमशाला येथे इंग्लंड पहिल्यांदाच खेळणार कसोटी!

धरमशाला येथे इंग्लंडचा संघ प्रथमच कसोटी सामना खेळताना दिसणार आहे. भारत येथे दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. यापूर्वी 2017 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे कसोटी खेळली होती, जी 8 विकेटने जिंकली होती.

या मालिकेबद्दल बोलायचं झालं तर, हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने विजय मिळवला. त्यानंतर भारताने विझाग, राजकोट आणि रांची कसोटीवर काबीज केला. आता जर धरमशाला कसोटी देखील इंग्लंड हरले, तर 112 वर्षांनंतर असे घडेल की 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडने 1-4 ने मालिका गमावेल.

पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन (England playing XI for 5th Test against India) - झॅक क्रावली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टली, मार्क वूड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()