England Squad for Pakistan Tour: ऑक्टोबरमध्ये इंग्लंडला पाकिस्तान दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडने १७ जणांचा संघ जाहीर केला आहे.
खरंतर आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या दृष्टीने पाकिस्तानमध्ये स्टेडियमच्या डागडुजीचे काम सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तानच ही मालिका होणार की दुसऱ्या देशात हलवण्यात येणार यावर अनिश्चितता आहे.
त्यामुळे इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने म्हटले होते की जोपर्यंत आम्ही कुठे खेळणार हे निश्चित होत नाही, तोपर्यंत आम्ही संघ निवडू शकत नाही. पण अखेर इंग्लंडने मंगळवारी (१० सप्टेंबर) संघाची घोषणा केली आहे.
याबरोबरच इंग्लंड क्रिकेटने असेही स्पष्ट केले की अद्यापही सामन्यांच्या ठिकाणे स्पष्ट व्हायची आहेत. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लवकरच घोषणा करेल.