Joe Root थांबायचं नाव घेत नसतो! जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत नोंदवला असा विक्रम जो जगात...

ICC World Test Championship : इंग्लंडचा फलंदाज जो रूट याचा फॉर्म हा अनेकांना धडकी भरवणारा ठरतोय. फॅब फोअरमध्ये कसोटी शतकांच्या बाबतीत मागे असलेला रूट कधी पुढे निघून गेला हे कोणाला समजलेही नाही.
Joe Root World Record in WTC
Joe Root World Record in WTC esakal
Updated on

Joe Root World Record in WTC : जो रूटने नुकतीच पार पडलेली श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका गाजवली. तिसऱ्या सामन्यात त्याला अपयश आले असले तरी तो मालिकेत सर्वाधिक ३७५ धावा करणारा फलंदाज ठरला. ३ सामन्यांच्या मालिकेत त्याने दोन शतकं झळकावली आणि कसोटीत इंग्लंडकडून सर्वाधिक ३४ शतकांचा विक्रम नावावर करताना एलिस्टर कूकला मागे टाकले.

रूटने मागील वर्षभरात कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केलेली दिसलीय आणि त्याने फॅब फोअरमध्ये खूप मोठी झेप घेतली आहे. २०२०नंतर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५६ सामन्यांत १७ शतकांसह पाच हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. या कालावधीत न्यूझीलंडचा केन विलियम्स त्याला कडवी टक्कर देताना त्याने ११ शतकं झळकावली आहे. विराट कोहली व स्टीव्ह स्मिथ या शर्यतीत कुठेही नाही. त्यांची सरासरी ३० च्या आसपासही नाही.

Joe Root World Record in WTC
हे काय झालं! Ruturaj Gaikwad दोन चेंडू खेळून रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला, कारण काय...

दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रूटने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठा पराक्रम केला. WTC मध्ये ५०० हून अधिक चौकार मारणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रूटने ३७ चौकार खेचले आणि तो ५२० चौकारांसह WTC मध्ये आघाडीवर पोहोचला. WTC मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्येही रूट ( ४९७३) अव्वल आहे. २०२३-२५च्या सायकलमध्ये रूटने २९ इनिंग्जमध्ये ५३.७६च्या सरासरीने ५ शतकं व ६ अर्धशतकांसह १३९८ धावा केल्या आहेत.

WTC मध्ये सर्वाधिक चौकार

  • जो रूट - ५२०

  • मार्नस लाबुशे - ४४६

  • स्टीव्ह स्मिथ - ३७९

  • झॅक क्रॅवली - ३५३

Joe Root
Joe Rootesakal

सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणार का?

जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल असा दावा केला जात आहे. तेंडुलकरने १५९२१ धावा केल्या आहेत आणि रूटच्या १२४०२ धावा आहेत. त्याला सचिनचा विक्रम मोडण्यासाठी ३५१९ धावा हव्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.