Eng vs Pak : आयर्लंडपाठोपाठ इंग्लंडपुढेही पाकिस्तान नतमस्तक; बटलरच्या संघाने बाबरच्या टीमला आणले रडकुंडी

England Beat Pakistan In 2nd T20 Match : आता टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरु होण्यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत, ज्यासाठी सर्व संघ आपली तयारी मजबूत करण्यात व्यस्त आहेत.
England Beat Pakistan In 2nd T20 Match
England Beat Pakistan In 2nd T20 Matchsakal
Updated on

England vs Pakistan 2nd T20 : आता टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरु होण्यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत, ज्यासाठी सर्व संघ आपली तयारी मजबूत करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 4 टी-20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे.

या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने झंझावाती अर्धशतक ठोकले. आणि त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. या मालिकेतील पहिला टी-20 सामना पावसात वाहून गेला.

England Beat Pakistan In 2nd T20 Match
KKR vs SRH Final: IPL ट्रॉफीसाठी भिडणार कोलकाता-हैदराबाद! जाणून घ्या कोण कोणाला ठरलंय वरचढ अन् फायनलचा रेकॉर्ड

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लिश संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 183 धावा केल्या. कर्णधार जोस बटलरने 51 चेंडूत 84 धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याने 8 चौकार आणि 3 षटकारही मारले. त्यांच्याशिवाय विल जॅकने 23 चेंडूत 37 धावा, जॉनी बेअरस्टोने 18 चेंडूत 21 धावा आणि फिल सॉल्टने 9 चेंडूत 13 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने तीन बळी घेतले. त्याच्याशिवाय इमाद वसीम आणि हारिस रौफ यांना प्रत्येकी 2 यश मिळाले.

England Beat Pakistan In 2nd T20 Match
T20 World Cup 2024 : कोहली-पांड्या टीम इंडियासोबत का गेले नाहीत अमेरिकेला? मोठे कारण आले समोर

184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 19.2 षटकात 160 धावांवरच मर्यादित राहिला. सलामीवीर मोहम्मद रिझवानचे खातेही उघडले नाही. फखर जमानने 21 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 45 धावा केल्या. त्यांच्याशिवाय कर्णधार बाबर आझमने 32, इफ्तिखार अहमदने 23 आणि इमाद वसीमने 22 धावा केल्या. इंग्लिश गोलंदाज रीस टोपलीने 3 बळी घेतले. त्यांच्याशिवाय मोईन अली आणि जोफ्रा आर्चर यांना 2-2 यश मिळाले. ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 1-1 बळी घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.