PAK vs ENG: पाकिस्तान मालिकेसाठी संघात निवड, तरीही इंग्लंडचा कर्णधार Ben Stokes च्या खेळण्यावर संभ्रम

PAK vs ENG Test Series Sports Updates in Marathi: पाकिस्तान-इंग्लंड मधील कसोटी मालिकेला ७ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असून दोन्हीही संघांची घोषणा झाली आहे.
ben stokes
ben stokesesakal
Updated on

Ben stokes recovery : गेल्या काही दिवसांपासून दुखापतीतून सावरत असलेला इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू व कर्णधार बेन स्टोक्स पाकिस्तानविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत पुनरागमन करण्याची शक्यता आहे. स्टोक्सच्या दुखापतीचा वैद्यकिय अहवाल लवकरच समोर येणार आहे आणि तोपर्यंत त्याच्या पाकिस्तान दौऱ्यावर खेळण्यावर संभ्रम आहे. असे असूनही त्याला संघात स्थान दिले गेले आहे. जागतीक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ही मालिका दोन्हीही संघांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे स्टोक्सचे पुनरागमन इंग्लंडच्या दृष्टीने महत्त्वाचे समजले जात आहे.

मांडीच्या दुखापतीमुळे श्रीलंका कसोटी मालिकेतून मैदानाबाहेर असलेला स्टोक्स पाकविरुद्धच्या मालिकेत पुन्हा संघाची सूत्रं हाती घेण्याची शक्यता आहे. 'दी हंड्रेड' लीगदरम्यान ११ ऑगस्ट रोजी मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे स्टोक्सला मैदानाबाहेर जावे लागले होते. त्यामुळे श्रीलंका कसोटी मालिकेदरम्यान इंग्लंड संघाची धुरा ३३ वर्षीय यष्टीरक्षक ऑली पोपने सांभाळली. इंग्लंडने या मालिकेत २-१ ने विजय मिळवला होता.

ben stokes
On This Day: आठ वर्षांचा असताना वडिलांना आयुष्य संपवताना पाहिलं, आई दोनदा कॅन्सरशी लढली, तरीही बेअरस्टो परिस्थितीला हरवत खंबीर उभा राहिला

इंग्लंड पुढील आठवड्यात तीन सामन्यांची कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. ७ ऑक्टोबर रोजी स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानमधील मुल्तान येथे खेळवला जाईल. WTC तालिकेत इंग्लंड पाचव्या स्थानी आहे. पाकिस्तान संघ बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर आठव्या स्थानी घसरला आहे. पाकिस्तान-इंग्लंड दरम्यान २०२२ मध्ये झालेल्या शेवटच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने ३-०ने विजय मिळवला होता.

कसोटी कारकीर्दित स्टोक्सने इंग्लंडसाठी एकूण १०५ सामन्यांत ६५०८ धावा केल्या आहेत. त्याने १३ शतके व ३४ अर्धशतकं झळकावली आहेत.

पाकिस्तान कसोटी संघ:

शान मसूद (कर्णधार), साऊद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, मीर हमजा, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नसीम शाह, नोमान अली, सईम अयुब, सलमान अली अघा, सर्फराज अहमद (यष्टीरक्षक), शाहीन शाह आफ्रिदी.

इंग्लंड कसोटी संघ:

बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, गस ॲटकिंन्सन, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, जोश हल, जॅक लीच, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रूट , जेमी स्मिथ, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.