ENG vs SL: इंग्लंडच्या श्रीलंकेवरील विजयानं WTC पाँइंट्सटेबलमध्ये मोठे बदल; भारत-ऑस्ट्रेलियाला देणार टक्कर?

England vs Sri Lanka 1st Test: इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत मोठे झेप घेतली आहे.
England Cricket Team
England Cricket TeamSakal
Updated on

World Test Championship 2023-25: श्रीलंका क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने ५ विकेट्सने जिंकला. यासह इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली. इतकेच नाही, तर या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेच्या गुणतालिकेतही इंग्लंडनेही मोठी झेप घेतली आहे.

या विजयामुळे आता इंग्लंडची विजयी टक्केवारी ४१.०७ झाली आहे, त्यामुळे त्यांनी तीन स्थानांची झेप घेत चौथा क्रमांक मिळवला आहे. त्यांनी श्रीलंकेलाही मागे टाकले आहे.

श्रीलंका चौथ्या क्रमांकावरून ४० च्या टक्केवारीसह पाचव्या क्रमांकावर घसरले आहेत. पण अद्याप या दोन संघातील दोन कसोटी सामने बाकी आहेत. त्यामुळे पुन्हा या क्रमवारीत बदलही होऊ शकतात.

सध्या इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आल्याने दक्षिण आफ्रिकाही ३८.८९ च्या टक्केवारीसह सहाव्या क्रमांकावर घसरले आहेत, तर पाकिस्तान ३६.६६ च्या टक्केवारीसह सातव्या क्रमांकावर घसरले आहेत.

England Cricket Team
ENG vs SL: एका हातात ड्रिंक अन् दुसऱ्या हातात बॉल, प्रेक्षकानं घेतला भन्नाट झेल, Video Viral
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.