PAK vs ENG: इंग्लंडला पाकिस्तान दौऱ्यासाठी संघच जाहीर करता येईना! कारण एकदा वाचा

England tour of Pakistan:पुढील महिन्यात इंग्लंडला पाकिस्तान दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी जायचे आहे. मात्र, त्यांना अद्याप संघनिवड करता येत नाहीये, यामागे नक्की काय कारण आहे, जाणून घ्या.
England Cricket Team
England Cricket TeamSakal
Updated on

Pakistan vs England Test Series: पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची जोरदार तयारी करत आहेत. देशातील स्टेडियममध्येही कामकाज सुरू आहे. सुविधा वाढवण्याचा प्रयत्न यावेळी सुरू आहे. मात्र याचा फटका त्यांच्या मायदेशातील काही महत्त्वाच्या मालिकांना बसण्याची शक्यता आहे. यात इंग्लंडच्या पाकिस्तान दौऱ्याचाही समावेश आहे.

इंग्लंडला पाकिस्तानमध्ये ७ ऑक्टोबरपासून कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र काही मिडिया रिपोर्ट्सनुसार हे सामने दुसऱ्या देशात हलवण्यात येणार आहे, यामागील कारण म्हणजे सध्या पाकिस्तानमधील स्टेडियमवर सुरू असलेली कामं. त्यामुळे ही स्टेडियम अद्याप सामने खेळवण्यासाठी तयार झाली की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने मुलतान, कराची आणि रावळपिंडी येथे खेळवले जाणार आहे. त्यामुळे तिथे काम सुरू आहे. दरम्यान, आता अशी शक्यता आहे की पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणारे सामने संयुक्त अरब अमिराती किंवा श्रीलंका येथे हलवण्यात येतील.

England Cricket Team
ENG vs SL 3rd Test: ७ देश, ७ शतकं! Ollie Pope चा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असे कुणालाच जमले नाही अन् जमण्याची शक्यता कमीच
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.