James Anderson: स्विंगचा जादूगार निवृत्ती मागे घेणार! अँडरसन पुन्हा फलंदाजांची भंबेरी उडवताना दिसणार

James Anderson Retirement: जेम्स अँडरसनने गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण अद्याप त्याने करियर संपलं नसल्याचं म्हटलं आहे.
James Anderson
James Anderson Sakal
Updated on

James Anderson considers return to white-ball format: इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने जुलै २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे त्याने क्रिकेटलाच अलविदा केले असल्याचे म्हटले जात होते, कारण तो गेल्या काही काळात मर्यादीत षटकांचे क्रिकेट खेळले नव्हते. मात्र आता तो मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या विचारात आहे.

४२ वर्षीय अँडरसनने लॉर्ड्सवर जुलैमध्ये वेस्ट इंडिजमध्ये शेवटची कसोटी खेळली. त्याने त्याच्या कारकि‍र्दीत १८८ कसोटीत ७०४ विकेट्स घेतल्या.

दरम्यान, आता अँडरसनने पीए न्यूज एजन्सीशी बोलताना सांगितले की 'कारकिर्द संपली असं म्हणण्यासाठी कदाचीत मी नकार देईल. कारण मला हे चांगलं माहित आहे की मी पुन्हा इंग्लंडकडून खेळणार नाही, पण मी अद्याप माझ्या क्रिकेट कारकि‍र्दीबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही.'

James Anderson
James Anderson : जेम्स अँडरसनला विजयाने निरोप; इंग्लंडची वेस्ट इंडीजवर डाव व ११४ धावांनी मात
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.