England Cricket: सट्टेबाजीप्रकरणी 28 वर्षीय खेळाडूचे निलंबन, इंग्लंड क्रिकेट बोर्डानं उचललं मोठं पाऊल

Brydon Carse: इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 28 वर्षी वेगवान गोलंदाजावर सट्टेबाजी प्रकरणात निलंबनाची कारवाई केली आहे.
Brydon Carse
Brydon CarseSakal
Updated on

Brydon Carse: टी20 वर्ल्ड कप 2024 तोंडावर असताना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सवर सट्टेबाजी केल्याच्या आरोपावरून तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहे.

28 वर्षीय कार्स वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत इंग्लंड संघाचा भागही होता. दरम्यान त्याच्यावर इंग्लंडच्या नव्याने स्थापन झालेल्या क्रिकेट नियामकाने भ्रष्टाचारविरोधी चौकशीनंतर ही बंदी घातली आहे. कार्सनेही हे आरोप मान्य केले आहेत आणि चौकशीसाठीही सहकार्य केले. त्याने 2017 ते 2019 दरम्यान वेगवेगळ्या सामन्यांवर 303 वेळा सट्टा लावला होता.

Brydon Carse
T20 World Cup: अमेरिकेतील मॅच पावसामुळे झाल्यात रद्द, भारत-बांगलादेश सराव सामन्यावेळी कसे असेल हवामान?

टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार त्याने तो खेळत असलेल्या सामन्यांवर सट्टा लावला नाही, पण त्याने त्याचा देशांतर्गत संघ डरहमच्या सामन्यांवर पैसे लावले होते.

मिळालेल्या माहितीनुसार सर्व गोष्टी लक्षात घेतल्यानंतर त्याच्यावर 16 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती, ज्यातील 13 महिन्यांवर स्थगिती देण्यात आली आहे. पण तीन महिन्यांच्या निलंबनामुळे तो 28 ऑगस्टपर्यंत क्रिकेट खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याची आगामी वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघात निवड होऊ शकत नाही.

Brydon Carse
IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या प्रवक्त्याने सांगितले की या प्रकरणाचा गांभीर्याने विचार केला जात आहे. तसेच क्रिकेट नियामकाने केलेल्या कारवाईचा सन्मानही ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर त्यांनी ब्रायडनबद्दल म्हटले तो सहकार्य करत आहे आणि केलेल्या चुकीसाठी त्याला पश्चाताप आहे. त्याला त्याची जबाबदारी समजायला लागली आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की हा अन्य खेळाडूंसाठी धडा असेल.

कार्स याने इंग्लंडसाठी आत्तापर्यंत 14 वनडे आणि 3 टी20 सामने खेळले आहे. त्याने 14 वनडेत 15 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 3 टी20 सामन्यांत 4 विकेट्स घेतल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com