Biggest ODI win : इंग्लंडने नोंदवला वन डे क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय, मोडला १९९३ सालचा विक्रम

ENGWvsIREW ODI : इंग्लंडच्या महिला संघाने आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये मंगळवारी वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. ३१ वर्षांपूर्वीचा विक्रम इंग्लंडने मोडला.
Biggest ODI win eng vs ire
Biggest ODI win eng vs ireesakal
Updated on

England Women vs Ireland Women ODI : इंग्लंडच्या महिला संघाने आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये आयर्लंडविरुद्ध विश्वविक्रमाची नोंद केली. इंग्लंडने दुसऱ्या वन डे सामन्यांत आयर्लंडच्या संपूर्ण संघाला ४५ धावांत तंबूत पाठवले आणि २७५ धावांनी विजय मिळवला. वन डे क्रिकेटमधील हा इंग्लंडच्या महिला संघाचा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी इंग्लंडच्या महिला संघाने १९९३ मध्ये डेन्मार्कविरुद्ध २३९ धावांनी मॅच जिंकली होती.

सलामीवीर टॅमी बियूमोंटने नाबाद १५० धावांच्या जोरावर इंग्लंडने ८ बाद ३२० धावा उभ्या केल्या. वन डे क्रिकेटमधील ही महिला खेळाडूची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. टॅमी व्यतिरिक्त फ्रेया केम्पने ४७ चेंडूंत ६५ धावांची खेळी करून इंग्लंडच्या धावसंख्येत हारभार लावला. प्रत्युत्तरात, आयर्लंडचा संपूर्ण संघ १६.५ षटकांत ४५ धावांत तंबूत परतला. वन डे क्रिकेटमधील ही आयर्लंडची निचांक धावसंख्या ठरली. यापूर्वी २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांना ४६ धावांवर ऑल आऊट केले होते. इंग्लंडच्या केट क्रॉस, लौरेन फिलर यांनी प्रत्येकी ३ आणि फ्रेया व जॉर्जिया डेव्हिस यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

Biggest ODI win eng vs ire
जगभरात BCCI ची नाचक्की; AFG vs NZ कसोटी सामन्यादरम्यान धक्कादायक प्रकार; आम्ही पुन्हा इथे येणार नाही, खेळाडूंचा पवित्रा

इंग्लंडचा वन डे क्रिकेटमधील मोठा विजय

  • २७५ धावा वि. आयर्लंड, आज

  • २३९ धावा वि. डेन्मार्क, १९९३

  • २३८ धावा वि. स्कॉटलंड, २००१

  • २३० धावा वि. पाकिस्तान, १९९७

  • २२५ धावा वि. दक्षिण आफ्रिका, २००८

इंग्लंडकडून वन डे तील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी

  • नाबाद १७३ ( १५५ चेंडू) - चॅर्लोट एडवर्ड्स वि. आयर्लंड, १९९७

  • नाबाद १६८ ( १४४ चेंडू) - टॅमी बियूमोंट वि. पाकिस्तान, २०१६

  • नाबाद १५६ ( १५१ चेंडू) - साराह टेलर वि. भारत, २००६

  • नाबाद १५० ( १३९ चेंडू) - टॅमी बियूमोंट वि. आयर्लंड, आज

आयर्लंडची वन डेतील निचांक कामगिरी

  • ४५/१० ( १६.५ षटकं) वि. इंग्लंड, आज

  • ४६/१० ( २३ षटकं) वि. ऑस्ट्रेलिया, २००१

  • ५३/१ ( ३५.४ षटकं) वि. दक्षिण आफ्रिका, २०१४

  • ५५/१० ( २६ षटकं ) वि. ऑस्ट्रेलिया, २००५

  • ६२/१० ( ३४ षटकं) वि. भारत, २००२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.