दोनाचे 'एक' होणार! इंग्लंड, स्कॉटलंड क्रिकेट संघांच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू, पण का?

ECB, Scotland Cricket: इंग्लंड आणि स्कॉटलंड क्रिकेट बोर्ड यांच्यात एकच संघ म्हणून खेळण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत आणि त्यामागे महत्त्वाचं कारणही आहे.
England Scotland Olympic 2028
England Scotland Olympic 2028esakal
Updated on

Scotland and England cricket players could join forces : क्रिकेट विश्वात आगामी काही वर्षात मोठ्या हालचाली होताना दिसणार आहेत. त्याची सुरूवात इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्ड अर्थात ECB आणि स्कॉटलंड क्रिकेट बोर्ड यांच्या विलीनीकरणाच्या चर्चेतून सुरू झाली आहे. ECB आणि क्रिकेट स्कॉटलंडने लॉस एंजेलिसमध्ये २०२८च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष आणि महिला संघ ग्रेट ब्रिटन क्रिकेट संघ म्हणून उतरवण्याच्या योजनांबद्दल चर्चा सुरू केली आहे.

१२८ वर्षांनंतर क्रिकेटचे पुनरागमन

२०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे आणि १९०० नंतर प्रथमच क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये परतणार आहे. याबाबतचा तपशिल येणे बाकी आहे, परंतु ICC ने महिला आणि पुरुष दोन्ही स्पर्धांसाठी सहा संघांच्या ट्वेंटी-२० सामन्यांचा प्रस्ताव ठेवला आहे. महिला व पुरुष क्रिकेट सामने एक आठवडाभर चालतील अशी अपेक्षा आहे. ICC च्या ट्वेंटी-२० क्रमवारीचा यावेळी विचार केला जाईल. बहुतेक देश त्यांच्या नेहमीच्या जर्सीत दिसतील, परंतु जर इंग्लंड पात्र ठरले, तर ते उर्वरित ग्रेट ब्रिटन म्हणून खेळतील आणि त्यांना स्कॉटलंडच्या खेळाडूंना सोबत घेऊन एक संघ बनवावा लागेल.

England Scotland Olympic 2028
अरेरे! पाकिस्तानला 'वडा पाव'च्या किमतीत विकावं लागतंय PAK vs BAN क्रिकेट सामन्याचं तिकीट, कारण...

ECB आणि क्रिकेट स्कॉटलंड यांनी प्रस्तावित ग्रेट ब्रिटन क्रिकेट संघांवर एकत्र काम करण्याबाबत प्राथमिक चर्चा केली आहे. क्रिकेट स्कॉटलंडकडून यासाठी सकारात्मक आहेत, आणि खेळाडू व कर्मचारी योगदान देण्यास उत्सुक आहे, परंतु ECB ही संघांची नामनिर्देशित प्रशासकीय संस्था असेल. "लॉस एंजेलिस ऑलिम्पिकला चार वर्ष आहेत. हे अगदी सुरुवातीचे टप्पे आहेत, परंतु आम्ही ग्रेट ब्रिटन टीम आणि क्रिकेट स्कॉटलंडशी याबाबत सकारात्मक पावले उचलण्याबद्दल बोलत आहोत," असे ईसीबीच्या प्रवक्त्याने cricinfo ला सांगितले.

गोल्ड, रग्बी, फुटबॉलमध्ये प्रयोग यशस्वी

ब्रिटीश ऑलिम्पिक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अँडी अँसन यांनी सोमवारी सांगितले की,"आम्हाला गोल्फ, रग्बी आणि महिला फुटबॉलमध्ये संघांमध्ये असा प्रयोग केल्याचा चांगला अनुभव मिळाला आहे. जिथे इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड ही चार राष्ट्रे एकत्र खेळली आहेत. हे राष्ट्रे एकत्रितपणे आणि एका देशाला मुख्य प्रशासकीय मंडळ म्हणून नामांकित करतात. त्यामुळे क्रिकेटमध्येही हे शक्य आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.