Mickleover CC vs Darley Abbey CC : झटपट क्रिकेटमध्ये रोज नवीन विक्रम बनतात आणि रोज ते तुटलेही जातात.. पण, रविवारी डर्बीशायर कौंटी क्रिकेट लीगमध्ये असा विक्रम नोंदवला गेला की सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. मिल्कओव्हर सीसी विरुद्ध डॅर्ली एबेय सीसी क्लबमधील सामन्यात सलामीवीराने १३७ चेंडूंच सामना करूनही एकही रन त्याने केला नाही. विशेष म्हणजे तो शून्य धावेवर नाबाद राहिला...
मिल्कओव्हर संघाने प्रथम फलंदाजी करताना ३५ षटकांत ४ बाद २७१ धावांवर डाव घोषित केला. सलामीवीर मॅक्स थॉम्सन याने १२८ चेंडूंत १७ चौकार व १४ षटकारांसह १८६ धावा चोपल्या. टीम रेन्स ( ३५) हा त्यानंतर संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. प्रत्युत्तरात, डॅर्ली संघाने ४५ षटकांत ४ बाद २१ धावा केल्या आणि सामना अनिर्णीत सुटला.
डॅर्ली संघाचा सलामीवीर इयान बेस्टविक ( Ian Bestwick) याने संयमी खेळ करून मिल्कओव्हर संघाला विजयापासून वंचित ठेवले. इयानने १३७ चेंडूंत नाबाद शून्य धावांची खेळी केली. मुज्ताबा सय्यदने ३ विकेट्स घेतल्या... पराभव टाळण्यासाठी डॅर्लीला मैदानावर एखादा फलंदाज उभा राहणे गरजेचे होते आणि ती जबाबदारी इयानने उचलली.
त्याला थॉमस बेस्टविकने साथ दिली... त्यानेही ७१ चेंडूंत फक्तत ४ धावा केल्या. लिएम फिंचने त्याला बाद केले. त्यानंतर निकोलस कटींगने ३४ चेंडूंत एकही धाव न करता नाबाद राहिला. अशा प्रकारे संघाने ४५ चेंडूंत ४ बाद २१ धावा करून सामना ड्रॉ राखला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.