भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारताच्या १६ सदस्यांचा संघ जाहीर केला. कार अपघातानंतर ऋषभ पंत याचे कसोटी संघात या मालिकेतून पुनरागमन होत आहे. जवळपास २० महिन्यांनंतर तो भारताच्या कसोटी संघात परतणार आहे. विराट कोहलीला घरच्या मैदानावरील मागील कसोटी मालिकेत दुसऱ्या बाळाच्या जन्मामुळे मुकावे लागले होते. तो आणि जसप्रीत बुमराह कसोटी मालिकेत पुनरागमन करत आहेत. जसप्रीत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विश्रांतीवर होता.
IND vs BAN पहिली कसोटी १९ सप्टेंबरला चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. त्यानंतर २७ सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर दुसरी कसोटी सुरू होईल. पण, पहिल्या कसोटीसाठी निवडलेल्या संघाने काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. या संघात श्रेयस अय्यर व मोहम्मद शमी या प्रमुख खेळाडूंना संधी दिली गेलेली नाही.
वन डे फॉरमॅटमधील फॉर्म अन् दुलीप ट्रॉफीत अर्धशतकी खेळी करूनही अय्यरला स्थान न मिळाल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पण, दीर्घ फॉरमॅटमधील असातत्य हे त्याला कसोटीत संधी न मिळण्यामागचं प्रमुख कारण आहे. या वर्षाच्या सुरुवातीला दुखापतीमुळे त्याला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. त्यात देशांतर्गत क्रिकेटकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे बीसीसीआयने वार्षिक करारातून त्याचे नाव कमी केले होते. त्यामुळे राष्ट्रीय संघातील त्याच्या निवडीच्या संधी कमी झाल्या. बुची बाबू निमंत्रित स्पर्धा आणि दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या डावात त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही.
आयपीएल २०२४ च्या विजेत्या कोलकाता नाइट रायडर्सचा तो कर्णधार होता, परंतु कसोटी संघातील मधल्या फळीतील स्थानासाठी त्याच्यासमोर सर्फराज खान व लोकेश राहुल यांनी आव्हान उभे केले आहे. सर्फराज व लोकेश यांनी कामगिरीत सातत्य राखले आहे.
निवड समिती प्रमुख अजित आगरकर याने बांगलादेश कसोटी मालिकेतून मोहम्मद शमी पुनरागमन करेल, असे संकेत दिले होते. पण, शमी त्याच्या फिटनेसवर अजूनही काम करतोय आणि त्यामुळे त्याचा समावेश केला गेलेला नाही. तो ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेत बंगालकडून खेळताना दिसू शकतो. न्यूझीलंडविरुद्धच्या ३ कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातही तो खेळणार नाही अशी चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.