Explainer : गौतम गंभीरने स्टाफसाठी सुचवलेली ५ नावं BCCI ने नामंजूर का केली? जाणून घ्या Inside Story

Gautam Gambhir's recommendation REJECTED - बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकांना स्वतःचा सपोर्ट स्टाफ आणण्याची परवानगी यापूर्वी दिली आहे, पण...
Gautam Gambhir's recommendation REJECTED by BCCI
Gautam Gambhir's recommendation REJECTEDsakal
Updated on

Gautam Gambhir's recommendation REJECTED by BCCI - भारतीय क्रिकेटमध्ये आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत आणि सर्व हवा ही गौतम गंभीरच्या मनासारखीच वाहतानाचे चित्र रंगवले जात आहे. पण, परिस्थिती थोडी वेगळी आहे. ज्या अटी व शर्थीवर गौतमने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक स्वीकारल्याचे बोलले जात होते, त्याच अटी BCCI कडून एकामागून एक नामंजुर होताना दिसत आहेत. गौतम गंभारने सपोर्ट स्टाफसाठी सुचवलेली ५ नावं आतापर्यंत बीसीसीआयकडून नाकारली गेली आहेत. पण, हे असं का होतंय?

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयासह राहुल द्रविड याने मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी पूर्ण केली. त्यानंतर बीसीसीआयने माजी सलामीवीर गौतम गंभीर याची कोच म्हणून निवड केली. गौतम गंभीरने या पदावर येण्यापूर्वी बीसीसीआयकडे स्वतःचा आवडीचा सपोर्ट स्टाफ आणि संघ निवडीचे सर्वाधिकार हवे असल्याची अट ठेवली होती. पण, सुरुवातीला गौतमला हो हो म्हणणाऱ्या बीसीसीआयने आता सपोर्ट स्टाफसाठी त्याने सुचवलेल्या ५ नावांवर फुल्ली मारल्याचे समोर येत आहे.

Gautam Gambhir's recommendation REJECTED by BCCI
Gautam Gambhirनं इमोशनल केलं! KKR साठीच्या निरोपाच्या Videoत मनातलं सर्व काही सांगितलं

गौतम गंभीरने टीम इंडियाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अभिषेक नायरचे नाव सुचवले आहे आणि या नावाला बीसीसीआय मंजूरी देण्याची शक्यता अधिक आहे. पण, अजूनही याबाबत अधिकृत माहिती हाती नाही. दरम्यान, गौतमने गोलंदाज प्रशिक्षक म्हणून विनय कुमार व लक्ष्मीपती बालाजी यांची नावे सुचवली होती, पण याला मंजुरी मिळणार नाही. त्यात त्याने फिल्डिंग कोचसाठी रायन टेन डोएश्चॅट आणि गोलंदाजी प्रशिक्षकसाठी दक्षिण आफ्रिकेच्या मॉर्ने मॉर्कलचे नाव सुचवलेले. पण, ही दोन्ही नावं बीसीसीआयने नामंजुर केली.

KKR चे भारताच्या स्टाफमध्ये वर्चस्व..

आश्चर्याची गोष्ट म्हणजे गौतम गंभीरने सुचवलेल्या या सर्व नावांच कनेक्शन कोलकाता नाईट रायडर्स हे आहे. हे सर्व खेळाडू KKR च्या कोचिंग सेट अपमध्ये होती आणि गौतमने त्यांच्यासोबत काम केले आहे.

बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकांना स्वतःचा सपोर्ट स्टाफ आणण्याची परवानगी यापूर्वी दिली आहे. ग्रेग चॅपेल, गॅरी कर्स्टन, रवी शास्त्री, अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड या सर्वांनी त्यांच्या कोचिंग स्टाफमध्ये त्यांची माणसं घेतली होती. पण, गंभीरच्या शिफारशींकडे पाहण्यात येत असलेला बदल लक्षणीय आहे.

Gautam Gambhir's recommendation REJECTED by BCCI
सुट्टी संपली, कामावर या! Gautam Gambhir ॲक्शन मोडवर, रोहित, विराट, जसप्रीतला पाठवला मॅसेज

इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसारर बीसीसीआय गंभीरला असे संकेत दिले आहेत की त्याची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करताना, त्याच्याकडे अनियंत्रित अधिकार नसतील. ही कृती बीसीसीआयच्या निर्णय प्रक्रियेतील व्यापक बदल दर्शवते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.