Babar Azam Retirement : खराब कामगिरीमुळे बाबर आझमची कसोटीतून निवृत्ती? जाणून घ्या Viral Post मागचं सत्य

Babar Azam retire from test Cricket? पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याला सातत्याने अपयश येत आहे. कसोटीतील मागील १६ इनिंग्जमध्ये त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्यात त्याने निवृत्ती घेतलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Babar Azam retirement
Babar Azam retirementesakal
Updated on

Babar Azam Retirement Viral post : पाकिस्तानचा संघ घरच्या मैदानावरही जिंकू शकत नाही, अशा अवस्थेत आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही त्यांच्यावर पराभवाचे ढग गडत झालेले पाहायला मिळत आहेत. त्यात माजी कर्णधार बाबर आझमचा फॉर्म हा संघासाठी चिंतेची बाब बनली आहे. त्याला कसोटीच्या मागील १६ डावांमध्ये एकही अर्धशतकी खेळी करता आलेली नाही. त्यात आता त्याच्या निवृत्तीची पोस्ट व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडावी आहे..

पाकिस्तानची हार अन्...

पाकिस्तानला पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने १० विकेट्स राखून पराभूत केले. मालिकेत १-० अशा आघाडीवर असलेल्या बांगलादेशने दुसऱ्या कसोटीवरही मजबूत पकड घेतली आहे. पाकिस्तानच्या पहिल्या डावाच्या २७४ धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशने २६४ धावा उभ्या केल्या. एकवेळ बांगलादेशचे ६ फलंदाज २६ धावांवर तंबूत परतले होते, परंतु लिटन दासने शतकी खेळी केली.

दुसऱ्या डावात पाकिस्तानची गाडी १७२ धावांवर घसरली. मोहम्मद रिझवान ( ४३) व सलमान आघा ( नाबाद ४७) यांनी पाकिस्तानची लाज वाचवली. बांगलादेशच्या हसन महमुद ( ५-४३) आणि नहिद राणा ( ४-४४) यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. विजयासाठी १८५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने चौथ्या दिवशी बिनबाद ४२ धावा केल्या आहेत. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे.

बाबर आझमची कामगिरी...

बाबरने कसोटीतील मागील १६ डावांत १४,२४,२७, १३,२४, ३९,२१,१४,१, ४१,२६,२३,०,२२,३१,११ अशी कामगिरी केली आहे. त्याने एकूण ५३ कसोटी सामन्यांत ४५.०५ च्या सरासरीने ३९२० धावा केल्या आहेत. त्यात ९ शतकं व २६ अर्धशतकं आहेत.

Babar Azam retirement
Babar Azam retirement esakal

निवृत्तीची पोस्ट खरी की खोटी?

खराब कामगिरी सुरू असलेल्या बाबर आझमच्या निवृत्तीचे वृत्त समोर आले आहे. त्यात असे लिहिले आहे की, मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. जेव्हा मी कर्णधार होतो, तेव्हा क्युरेटरला मी फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टी बनवायला सांगायचो, जेणेकरून मी चांगल्या धावा करू शकत होतो. पण शान मसूद कर्णधार झाल्यापासून मला पन्नास धावाही करता येत नाही, कारण त्याने क्युरेटरला फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टी तयार न करण्यास सांगितले आहे...

बाबर आजमच्या नावाने व्हायरल होत असलेली ही पोस्ट खोटी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.