Ruturaj Gaikwad: धोनी, रोहित, विराटप्रमाणे आता ऋतुराजसाठीही प्रेक्षकानं तोडली स्टेडियमची सुरक्षा, मैदानात येत थेट पायाच पडला

spectator invades pitch to meet Ruturaj Gaikwad: दुलीप ट्रॉफी सामन्यादरम्यान एका प्रेक्षकाने मैदानाची सुरक्षा तोडली आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडची भेट घेतल्याची घटना घडली.
Ruturaj Gaikwad
Ruturaj GaikwadSakal
Updated on

Duleep Trophy, India C vs India D: भारतात सध्या दुलीप ट्रॉफी खेळली जात आहे. या स्पर्धेतील पहिल्या फेरीत इंडिया सी विरुद्ध इंडिया डी संघात अनंतपुरममधील आरडीटी स्टेडियमवर सामना होत आहे. या सामन्यादरम्यान शुक्रवारी एक प्रेक्षक सुरक्षा तोडत थेट मैदानात घुसला होता.

झाले असे की इंडिया सी संघ क्षेत्ररक्षण करत असताना एक प्रेक्षक अचानक मैदानात घुसला आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडला येऊन भेटला. असं अचानक प्रेक्षक आल्याने सर्वजण चकीत झाले होते. तो प्रेक्षक येऊन ऋतुराजच्या पाया पडला. यावेळी ऋतुराजनेही शांततेत परिस्थिती हाताळली. सध्या या घटनेचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Ruturaj Gaikwad
Musheer Khan : २१ चेंडूंत कुटल्या ९४ धावा! Duleep Trophy मध्ये मुशीर खानने मोडला तेंडुलकरचा मोठा विक्रम
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.