Chad Bowes fastest List A double-hundred - न्यूझीलंडचा फलंदाज चॅड बोवेसने याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये वेगवान द्विशतकाचा विक्रम बुधवारी केला. The Ford Trophy स्पर्धेत Canterbury संघाचे प्रतिनिधित्व करणारा बोवेसने Otago संघाविरुद्ध ही विक्रमी खेळी केली. त्याने १०३ चेंडूंत द्विशतक झळकावले आणि यासह त्याने ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडचा ( ११४ चेंडू वि. क्विन्सलँड्स, २०२१) विक्रम मोडला. कँटेबरीने ९ बाद ३४३ धावांचा डोंगर उभा केल्या आणि प्रत्युत्तरात आलेल्या ओटागोला १०३ धावांवर गुंडाळून २४० धावांनी विजय मिळवला.