Pakistan Cricket मध्ये पुन्हा मोठा बदल! माजी दिग्गजाने दिला सिलेक्टर पदाचा राजीनामा, कारणही सांगितलं

Mohammad Yousuf Steps Down as Pakistan Men's Cricket Team Selector: पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने सिलेक्टर पदाचा राजीनामा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
Mohammad Yousuf
Mohammad YousufSakal
Updated on

Mohammad Yousuf: पाकिस्तान क्रिकेट संघात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीमधील निवडकर्ता म्हणून राजीनामा दिला आहे.

५० वर्षीय मोहम्मद युसूफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की त्यांनी हा निर्णय वैयक्तिक कारणाने घेतला आहे.

Mohammad Yousuf
Pakistan Cricket: पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणाऱ्या पहिल्या पाकिस्तानी क्रिकेटरचं निधन

त्यांनी लिहिले, 'पाकिस्तान क्रिकेट संघाचा निवडकर्ता पदाचा मी वैयक्तिक कारणाने राजीनामा देत आहे. या संघाची सेवा करायला मिळाली, याचा मला अभिमान आहे. पाकिस्तान क्रिकेटच्या यशात आणि विकासासाठी योगदान दिल्याबद्दल आनंद आहे. मला आपल्या खेळाडूंच्या प्रतिभेवर विश्वास आहे. संघाला आणखी यश मिळवून देत राहण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.'

मोहम्मद युसूफ यांना मार्च २०२४ मध्ये निवडकर्ता म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी टी२० वर्ल्ड कप २०२४ साठी पाकिस्तान संघही निवडला होता. तसेच बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेसाठीही त्यांनी संघ निवडला होता. पण आता त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे.

Mohammad Yousuf
Pakistan Cricket: पाकिस्तानला क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का! WTC मधील मालिका तोंडावर असताना मीडिया हक्कच कोणी खरेदी करेना

दरम्यान युसूफ यांनी १९९८ ते २०१० दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. यादरम्यान त्यांनी ९० कसोटी सामने खेळले असून ५२.२९ च्या सरासरीन ७५३० धावा केल्या. यामध्ये २४ शतकांचा आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच २८८ वनडे सामने खेळले असून ९७२० धावा केल्या आहेत. यामध्ये १५ शतके आणि ६४ अर्धशतके केली आहेत. त्यांनी ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामनेही खेळले असून ५० धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.