Graham Thorpe Dies : क्रिकेट विश्वात शोककळा! महान क्रिकेटपटूचं निधन; आजारपणाशी झुंज अपयशी

Graham Thorpe died News : क्रिकेट चाहत्यांसाठी एक दु:खद बातमीमध्ये बातमी येत आहे. ज्यामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरला आहे.
Graham Thorpe Dies
Graham Thorpe Diessakal
Updated on

Graham Thorpe died News : क्रिकेट चाहत्यांसाठी एक दु:खद बातमीमध्ये बातमी येत आहे. ज्यामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरला आहे. नुकतेच हाती आलेल्या माहितीनुसार, इंग्लंडचे माजी दिग्गज फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांचे निधन झाले. ग्रॅहम थॉर्प हे दीर्घकाळ आजारी होते. त्याच्या आजाराचा खुलासा झालेला नाही. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलने सोमवारी (5 ऑगस्ट, 2024) ही माहिती शेअर केली.(Former England cricketer Graham Thorpe has died, aged 55)

Graham Thorpe Dies
Fact Check: खांद्यावर बंदुक अन् आरशात पाहून अचूक नेम; ऑलिम्पिकमधील व्हायरल झालेल्या 'त्या' फोटोचं काय आहे सत्य?

ग्रॅहम थॉर्पने इंग्लंडकडून जवळपास 100 कसोटी सामने खेळले, त्याने ज्यात 6744 धावा केल्या. यादरम्यान 16 शतके आणि 39 अर्धशतके त्याच्या नावावर आहेत. तर इंग्लंडसाठी 82 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 21 अर्धशतकांसह 2380 धावा केल्या आहेत.

यासोबत 341 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 49 शतकांच्या मदतीने 21937 धावा केल्या. तसेच त्याने लिस्ट ए मध्ये 10871 धावा केल्या ज्यात त्याने आपल्या बॅटने 9 शतके झळकावली. थॉर्पने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत एकूण 58 शतके झळकावली होती.

ग्रॅहम थॉर्पने टीम इंडियाविरुद्ध पाच कसोटीत 35 पेक्षा जास्त सरासरीने 283 धावा केल्या. टीम इंडियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात या खेळाडूने 36 पेक्षा जास्त सरासरीने 328 धावा केल्या. टीम इंडियाविरुद्ध या खेळाडूची सरासरी निश्चितच चांगली होती पण तो कधीच शतक करू शकला नाही.

Graham Thorpe Dies
IND vs SL : एक, दोन, तीन नाही पठ्ठ्याने टीम इंडियाच्या ६ खेळाडूंची केली शिकार, कोण आहे जेफ्री वँडरसे?

थॉर्प यांची कोचिंग कारकीर्द

ग्रॅहम थॉर्प हा केवळ खेळाडूच नव्हे तर प्रशिक्षक म्हणूनही खूप लोकप्रिय होता. या खेळाडूने 2005 मध्ये न्यू साउथ वेल्सचे प्रशिक्षकपद भूषवले आणि त्यानंतर त्याला इंग्लंड लायन्सचे प्रशिक्षक बनवण्यात आले. युवा खेळाडूंना तयार करणे हे त्यांचे काम होते.

2013 च्या सुरुवातीस थॉर्प इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-20 संघांचे फलंदाजी प्रशिक्षक बनला. त्यानंतर 2020 मध्ये त्याला पाकिस्तान विरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान संघाचे अंतरिम प्रशिक्षक बनवण्यात आले, 2022 मध्ये तो अफगाणिस्तानचा मुख्य प्रशिक्षक बनला होता, परंतु हे पद स्वीकारण्यापूर्वीच तो एका गंभीर आजाराला बळी पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.