त्यानं स्वतःचं आयुष्य संपवलं! Graham Thorpe च्या कुटुंबियांचा धक्कादायक खुलासा

Graham Thorpe death: इंग्लंडचा माजी फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांचा मागील दोन वर्ष आयुष्याशी संघर्ष सुरू होता आणि २०२२ मध्ये त्यांनी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता.
Graham Thorpe death
Graham Thorpe deathesakal
Updated on

Graham Thorpe death: इंग्लंडचा माजी फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांचे ५ ऑगस्टला निधन झाले. पण, त्यांचे मानसिक आरोग्य ढासळले होते आणि त्यातूनच त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवल्याचा धक्कादायक खुलासा त्यांच्या पत्नीने केले आहे.

५४ वर्षीय थॉर्प यांनी इंग्लंडकडून १०० कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यानंतर त्यांनी बराच काळ कोचिंग स्टाफमध्ये घालवला. पण, मागील दोन वर्ष त्याचा आयुष्याशी संघर्ष सुरू होता आणि २०२२ मध्ये त्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता.

दी टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत थॉर्प यांची पत्नी अमांडा यांनी सांगितले की,"अलिकडच्या काळात तो खूप आजारी होता आणि तो प्रचंड नैराश्यात गेला होता. मे २०२२ मध्ये त्याने जीव देण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दीर्घकाळ उपचार घ्यावे लागले होते.'' थॉर्प यांच्या पश्चात पत्नी अमांडा आणि त्यांच्या दोन मुली किट्टी ( २२) व एम्मा ( १९) आहेत.

Graham Thorpe's
Graham Thorpe's esakal

वन डे सामन्यांमध्ये थॉर्प यानी ८२ सामन्यांच्या ७७ डावांमध्ये २३८० धावा केल्या होत्या. “तो सतत नैराश्य आणि चिंतेने ग्रस्त राहिला. आम्ही एक कुटूंब म्हणून त्याला पाठिंबा दिला आणि त्याने अनेक उपचार केले, पण दुर्दैवाने त्यापैकी काही उपयोगी नाही आले,'' असे अमांडा यांनी सांगितले.

''खेळाच्या मैदानावर त्याची मानसिक कणखरता अनेकदा दिसल आणि त्याची शारीरिक तंदुरुस्तीही चांगली होती. पण, एका मानसिक आजारपण आले की त्यातून कुणाचीही सुटका होणे अशक्य आहे आणि हा खूप गंभीर आजार आहे,''असेही अमांडा म्हणाली. थॉर्प हे क्रिकेट कुटुंबातील एक लाडके सदस्य होते आणि जगभरातील चाहत्यांचा त्यांना आदर होता.

''त्याची प्रकृती एवढी खराब झाली होती आणि त्याच्याशिवाय आमचं आयुष्य अधिक चांगलं होईल, असे त्याला वाटू लागले होते. हाच विचार करून त्याने स्वतःचं आयुष्य संपवले. हे सांगताना आम्हाला अजिबात वाईट वाटत नाही. यात काही लपवण्यासारखे नाही किंवा हे लांच्छनास्पदही नव्हते. आम्ही त्याला सर्वतोपरी मदत केली आणि त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने त्याचं आयुष्य संपवलं. आम्ही हे सांगतोय कारण, या मानसिक आजाराबाबत जनजागृती व्हायला हवी,''असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.