Former New Zealand batter announced retirement: न्यूझीलंडचा माजी फलंदाज जॉर्ज वर्कर ( George Worker ) याने वयाच्या ३४ व्या वर्षी व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने गुंतवणूक सेवा फर्ममध्ये नोकरी करण्याची ऑफर स्वीकारली आहे.
''व्यावसायिक क्रिकेटमधील १७ वर्षांच्या पूर्ण प्रवासानंतर, मी निवृत्ती जाहीर करत आहे. माझ्या आयुष्यातील अविश्वसनीय अध्याय संपला आणि एका नवीन प्रवासाची सुरुवात झाली आहे," असे वर्करने सांगितले. वर्करने त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीला सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सकडून सुरुवात केली आणि ऑकलंडसह हा प्रवास संपुष्टात आला. "माझ्या संपूर्ण कारकीर्दित मी काही छान मित्र बनवले आणि जे आयुष्यभर टिकतील आणि आठवणी मी कायम राखेन," असे वर्करने म्हटले.
वर्करने त्याच्या अल्पशा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दित २०२५ ते २०१८ या काळात १० वन डे व २ ट्वेंटी-२० सामने खेळले आणि त्यात अनुक्रमे २७२ व ९० धावा केल्या आहेत. २०१५ मध्ये त्याने झिम्बाब्वे दौऱ्यावरून ट्वेंटी-२०त पदार्पण केले आणि हरारे येथे ३८ चेंडूंत ६२ धावा करून मॅन ऑफ दी मॅच हा पुरस्कारही जिंकला. २०१७च्या फोर्ड ट्रॉफी स्पर्धेत सेंट्रल डिस्ट्रीक्टकडून खेळताना त्याने ८२.३७च्या सरासरीने ६५९ धावा केल्या.
त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे संघात पदार्पण केले आणि त्यानंतर तो आयर्लंड व वेस्ट इंडिजविरुद्धही वन डे मॅच खेळल्या. वर्करने मार्च २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या त्यांच्या घरच्या मालिकेसाठी वन डे संघात प्रवेश मिळवला होता. मार्क चॅपमनला कोविड-१९मुळे माार घ्यावी लागली आणि वर्करची निवड झाली, परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.
वर्करने १६९ लिस्ट ए गेममध्ये १८ शतकं आणि ३७ अर्धशतकांसह ४३.६४ च्या सरासरीने६७२१ धावा केल्या. प्रथम श्रेणी ( २९.४९ च्या सरासरीने ६४०० धावा) आणि ट्वेंटी-२०त ( १२३.५७ च्या स्ट्राइक रेटने ३४८० धावा) त्याने चांगली कामगिरी केली आहे.
वर्करने २००७-०८ च्या हंगामात सेंट्रल डिस्ट्रीक्टसाठी पदार्पण केले आणि त्यानंतर लगेचच १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले. वर्करने लिस्ट ए क्रिकेटमध्ये ६०, ट्वेंटी-२०मध्ये ४२ आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५८ विकेट्स घेतल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.