Sanju Samson: 'कितीही चान्स मिळाले, तरी...'सॅमसन सलग दुसऱ्यांदा शुन्यावर आऊट झाल्यानंतर मजेशीर Memes व्हायरल

Sanju Samson Memes: संजू सॅमसन श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत सलग दुसऱ्यांचा शुन्यावर बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक मजेशीर मीम्स व्हायरल झाले आहेत.
Sanju Samson memes viral
Sanju Samson memes viralSakal
Updated on

India vs Sri Lanka, T20I: भारत विरुद्ध श्रीलंका संघात तिसरा टी२० सामना पाल्लेकेले येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने सुपरओव्हरमध्ये विजय मिळवला आणि टी२० मालिका ३-० अशा फरकाने जिंकली.

दरम्यान, या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. मात्र भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. भारताने ९ षटकातच ४८ धावांवर ५ विकेट्स गमावल्या होत्या.

यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या संजू सॅमसनचाही समावेश होता. मात्र तो ४ चेंडू खेळल्यानंतर एकही धाव न करता बाद झाला. तो याआधी श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यातही शुन्यावर बाद झाला होता. त्यामुळे आता त्याच्यावर टीका होत आहे.

Sanju Samson memes viral
Sanju Samson: 'जसप्रीत बुमराहनंतर तोच...', राजस्थानच्या क्वालिफायरमधील पराभवानंतर सॅमसनने कोणाचं केलं इतकं कौतुक?

खरंतर यापूर्वी अनेकदा त्याला जेव्हा भारतीय संघात संधी मिळाली नव्हती, त्यावेळेस अनेकांनी निवड समितीवर टीका केली होती. त्याच्या चाहत्यांनीही याबाबत अनेकदा सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर संजू सॅमसन सातत्य राखण्यात आता अपयशी ठरताना दिसत असताना त्याच्याबाबत अनेक मीम्सही व्हायरल होत आहेत.

एका सोशल मिडिया युझरने एक मीम शेअर केले आहे, ज्यात संजू सॅमसनचा फोटो असून त्यावर लिहिले आहे की 'मी संजू सॅमसन शपथ घेतो की कितीही संधी मिळाल्या , तरी धावा करणार नाही.' याव्यतिरिक्त देखील अनेक मीम्स सध्या व्हायरल होत आहेत.

संजू सॅमसनच्या नावावर नकोसा विक्रम

दरम्यान, २०२४ मध्ये सॅमसन आंतरराष्ट्रीय टी२० सॅमसन शुन्यावर बाद होण्याची ही तिसरी वेळ होती. याआधी तो श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात आणि जानेवारीमध्ये बंगळुरूला झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी२० सामन्यातही शुन्यावर बाद झाला होता.

त्यामुळे तो आता एकाच वर्षात आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये तीनवेळा शुन्यावर बाद होणारा भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा नकोसा विक्रम युसूफ पठाण, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी केला आहे.

युसूफ २००९ मध्ये तीन वेळा शुन्यावर बाद झाला होता, तर विराट २०२४ मध्ये तीनवेळ शुन्यावर बाद झाला. रोहितने २०१८ आणि २०२२ साली तीनवेळा शुन्यावर बाद झाला होता.

सॅमसनने आत्तापर्यंत ३० आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ४४४ धावा केल्या आहेत.

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताला २० षटकात ९ बाद १३७ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर श्रीलंकनेही २० षटकात ८ बाद १३७ धावाच केल्या. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेला २ बाद २ धावाच करता आल्या. त्यानंतर भारताकडून सूर्यकुमारने सुपर ओव्हरमध्ये चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.