Viral Video: विराट-जड्डूची मैदानात मस्ती! बुमराहसमोर केली त्याचीच नक्कल अन् मग...

ND vs BAN 2nd Test: पावसाच्या उपस्थितीमुळे भारत बांगलादेश दुसरा कसोटी सामना थांबवावा लागला असून दिवसाअंती ३ बाद १०७ धावा अशी बांगलादेशची धावसंख्या आहे.
indian players
indian players esakal
Updated on

Indian player funny videos: कानपूर येथे भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. सामन्यादरम्यान पावसाने हजेरी लावल्याने पहिल्या दिवसाचा खेळ ३५ षटकांनंतर स्थगित करण्यात आला आहे. परंतु सामन्यादरम्यान मैदानावर काही विनोदी किस्से घडले आहेत. सामन्यादरम्यान व सामन्याआधीचे भारतीय खेळाडूंच्या मस्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

व्हिडिओमध्ये विराट कोहली इतर खेळाडूंसोबत मस्ती करताना पाहायला मिळत आहे. विराटची ही पहिलीच वेळ नसून विराट नेहमीच मैदानावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना पाहायला मिळतो.

indian players
IND vs BAN, Video: ऋषभ पंतचा सल्ला ऐकला अन् अश्विनला बांगलादेशी कर्णधाराची मिळाली विकेट, पाहा कशी खेळली चाल

भारत-बांगलादेश पहिल्या कसोटी सामन्यातही विराट कोहलीचे डान्स करत अनोखे सेलिब्रेशन पाहायला मिळाले होते. सामन्याच्या सुरूवातीला आकाश दीपने घेतलेल्या शादमन इस्लामच्या विकेटवर रोहित शर्मा आश्चर्यचकीत होताना पाहायला मिळाला.

तर एका व्हिडिओमध्ये सरावादरम्यान भारतीय फलंदाज विराट कोहली आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा जसप्रीत बुमराहच्या बॉलिंग ॲक्शनची नक्कल करताना पहायला मिळाले. विराट आणि जडेजाच्या या अनोख्या ॲक्शनचा आनंद घेत बुमरासह संघातील इतर खेळाडू हसताना दिसत आहेत.

तर आणखी एका व्हिडिओमध्ये दिग्गज खेळाडू विराट कोहली व रवींद्र जडेजा यांचा 'याराना' पाहायला मिळत आहे. बांगलादेशच्या पहिल्या डावादरम्यान विराट व जडेजा सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना विराटने केलेल्या विनोदावर हसत आहेत.

दरम्यान पावसाच्या उपस्थितीमुळे भारत बांगलादेश दुसरा कसोटी सामना उशिरा चालू झाला. परंतु ढग मोकळे होताच सामन्याला सुरुवात झाली. भारताने नाणफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली तर बांगलादेशने झाकीर हसन व शादमन इस्लामची सलामीजोडी फलंदाजीसाठी मैदानावर पाठवली. पण भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दिपने त्यांना फार काळ मैदानावर टिकू दिलं नाही. झाकीर हसनला शून्यावर व शादमन इस्लामला २४ धावा करून माघारी पाठवले. आर अश्विनने कर्णधार नजमूल हुसैन शांतोला ३१ धावांवर बाद केले. मोमिनुल हक (४०), मुश्फिकुर रहीम (६) धावांवर नाबाद असून पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबवावा लागला. पहिल्या दिवसाअंती बांगलादेशची धावसंख्या ३५ षटकात ३ बाद १०७ धावा अशी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.