Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

Pakistan Cricket Coach: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वनडे, टी20 आणि कसोटी संघासाठी नव्या प्रशिक्षकांची नियुक्ती केली आहे.
Jason Gillespie
Gary Kirsten Jason Gillespie Pakistan Cricket Team coaches Newssakal
Updated on

Pakistan Cricket Team Coach News : गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तान क्रिकेट संघ मुख्य प्रशिक्षक शोधत होता. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन आणि वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी मुख्य प्रशिक्षक बनण्याची चर्चा होती. पण आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) परदेशी कोच मिळाला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2011 मध्ये भारताला वर्ल्ड कप मिळवून देणारा गुरू दक्षिण आफ्रिकेचा गॅरी कर्स्टनला वनडे आणि टी20 संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीला कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे.

याशिवाय अझर मेहमूद कर्स्टन आणि गिलेस्पी यांना सहाय्यक प्रशिक्षक म्हणून मदत करेल.

Jason Gillespie
PAK vs NZ, T20I: न्यूझीलंडने दिलेलं टेंशन, पण पाकिस्तानने साधली बरोबरी; बाबर बनला सर्वात यशस्वी कॅप्टन

पाकिस्तान क्रिकेट संघासाठी पुढील मोठे आव्हान आहे, ते म्हणजे जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार टी-20 वर्ल्ड कप.

पाकिस्तानने नोव्हेंबर 2023 मध्ये काही महत्त्वाचे बदल केले होते. यात त्यांनी मिकी आर्थर, ग्रँट ब्रॅडबर्न आणि अँड्र्यू पुटिक या सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना लाहोरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये नियुक्त केले होते.

या नियुक्तीनंतर या तिघांनीही जानेवारी 2023 मध्ये आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक पद रिक्त होते. त्यानंतर आता ही पदे भरण्यात आली आहेत. (Gary Kirsten Jason Gillespie Pakistan Cricket Team coaches)

Jason Gillespie
IPL 2024: आठ विजय, एक पराभव अन् 16 पाँइंट्स; तरी राजस्थान रॉयल्स अजूनही प्लेऑफसाठी पात्र नाही, जाणून घ्या कारण

पाकिस्तानना कर्स्टन, गिलेस्पी आणि मेहमूदबरोबर 2 वर्षांचा करार केला आहे. दरम्यान कर्स्टन आयपीएल 2024 स्पर्धा संपल्यानंतर पाकिस्तान संघाशी जोडले जातील. कर्स्टन सध्या गुजरात टायटन्स या आयपीएल संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आणि मेंटॉर आहेत.

गिलेस्पी ऑगस्टमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश संघात होणाऱ्या कसोटी मालिकेवेळी पाकिस्तान संघाशी जोडला जाईल.

दरम्यान या दोघांनाही प्रशिक्षकपदाचा अनुभव आहे. गर्स्टन यांनी भारताव्यतिरिक्तही इतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघांचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे. तसेच ते आयपीएलमध्येही गेली अनेकवर्षे प्रशिक्षक म्हणून सक्रिय आहेत.

याशिवाय गिलेस्पीने यॉर्कशायर कौउंटी संघाचे प्रशिक्षकपद सांभाळताना त्यांना 2014 आणि 2015 साली विजेतेपद जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तसेच त्याने बिग बॅश लीगमध्येही प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.