Gary Kirsten चा राजीनामा अन् पाकिस्तानला लगेच सापडला नवा प्रशिक्षक; PCB चा अजब कारभार

Gary Kirsten resigns as Pakistan Coach: गॅरी कर्स्टन यांनी अखेर पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर आता ऑस्ट्रेलियन दिग्गजाकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही जबाबदारी सोपवली आहे.
Gary Kirsten
Gary Kirsten quit as Pakistan coach Sakal
Updated on

Pakistan ODI and T20I coach: पाकिस्तान क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल पाहायला मिळत आहेत. नुकतेच रविवारी (२७ ऑक्टोबर) पाकिस्तानने नव्या वनडे आणि टी२० कर्णधाराची घोषणा केली होती. मोहम्मद रिझवानकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही जबाबदारी सोपवली आहे.

पाकिस्तानला पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर जायचे असून दोन्ही दौऱ्यामध्ये वनडे आणि टी२० मालिका खेळायची आहे. मात्र या दौऱ्यांपूर्वीच पाकिस्तान संघासाठी मोठा बदल झाला आहे.

गॅरी कर्स्टर्न यांनी पाकिस्तान्या वनडे आणि टी२० संघाचे प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सहा महिन्यांच्या आतच प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. कर्स्टन यांना एप्रिल २०२४ च्या अखेरीस वनडे आणि टी२० संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते.

Gary Kirsten
Pakistan Cricket: पाकिस्तानने नवा ODI-T20I कॅप्टन केला जाहीर; 'हा' खेळाडू घेणार बाबर आझमची जागा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.