भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने त्याचा ऑल टाईम सर्वोत्तम भारतीय संघ जाहीर केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गौतमच्या संघात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला स्थान दिलेले नाही.
गौतम गंभीरने सलामीच्या जोडीसाठी स्वतःसह वीरेंद्र सेहवाग याची निवड केली आहे. या दोघांनी भारताच्या सर्व फॉरमॅटच्या संघात सलामीला बहुमूल्य योगदान दिले आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी राहुल द्रविड हा गंभीरच्या संघात आहे. द्रविड हा भारतीय संघाचा पाठीचा कणा होता आणि त्याच्या संयमी खेळीमुळे संघाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत. वन डे आणि कसोटीतही त्याचे योगदात खूप महत्त्वाचे आहे.
सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे गंभीरच्या संघात अनुक्रमे चौथ्या वव पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतील. तेंडुलकर व कोहली हे भारताचे महान फलंदाज आहेत. तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हटले जाते, तर विराट हा किंग कोहली आहे. विराटने वन डे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकाचा तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.
युवराज सिंगची फिरकी अष्टपैलू म्हणून निवड केली गेली आहे. युवीने २००७ व २०११ च्या वर्ल्ड कप विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. २०११ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत तो प्लेअर ऑफ दी मॅच होता. MS Dhoni हाही गंभीरच्या या संघात आहे. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेंटी-२०, वन डे वर्ल्ड कप व चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे.
महान गोलंदाज अनिल कुंबळे व आर अश्विन यांच्या खांद्यावर फिरकीची जबाबदारी गौतमने सोपवली आहे. कुंबळने कसोटी क्रिकेटमध्ये ६१९ विकेट्स घेतल्या आहेत आणि वन डेतील त्याची आकडेवारी उल्लेखनीय आहे. आर अश्वन हा कसोटीत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे. २०११च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता.
इरफान पठाण व झहीर खान यांच्यावर जलदगती गोलंदाजीची जबाबदारी आहे. दोघंही डावखुरे जलदगती गोलंदाज आहेत..
Gautam Gambhir all-time best India XI - वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग, अनिल कुंबळे, आर अश्विन, इरफान पठाण, झहीर खान.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.