IND vs NZ : मुंबईतील सामन्यात Harshit Rana ला संधी नाही; ऑस्ट्रेलियाविरूद्ध पदार्पण करणार, सिराजच्या संघातील स्थानाला धोका

IND vs NZ 3rd Test: वेगवान गोलंदाज हर्षित राणा न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा भाग नसेल यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
harshit Rana
harshit Ranaesakal
Updated on

IND vs NZ 3rd Test: भारताचा न्यूझीलंडविरूद्धचा अंतिम कसोटी सामना उद्यापासून वानखेडे मैदानावर खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडकडे भारतीय संघाला व्हॉईट वॉश करण्याची संधी आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी हा सामना महत्वाचा असून भारताला उर्वरीत सहा कसोटी सामन्यांपैकी किमान ४ सामने जिंकणे गरजेचे आहे. मागच्या कसोटीत भारतीय वेगवान फलंदाजांना फारसे यश मिळाले नसल्याने, तिसऱ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज हर्षित राणाला संघात संधी दिली जाईल असे वृत्त समोर आले होते.

बुधवारी (३० ऑक्टोबर) झालेल्या पत्रकार परिषदेत सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी संघात कोणत्याही अतिरिक्त खेळाडूचा समावेश केलेला नाही असे सांगितले. हर्षित राणा न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत राखीव खेळाडू म्हणून संघाचा भाग होता. पण, त्याला भारतीय संघात पदार्पणाची संधी मिळाली नाही. त्याला रणजी ट्रॉफी स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी रिलीज केले गेले होते. वेगवान गोलंदाज हर्षित राणाने आसामविरूद्धच्या सामन्यात आपले अष्टपैलू कौशल्य दाखवले. या सामन्यात त्याने ७ विकेट्सह ५९ धावांची अर्धशतकीय खेळी केली.

harshit Rana
IND vs NZ 3rd Test : Harshit Rana ला बोलावलं हे खरं आहे, पण...! अभिषेक नायरच्या विधानाने अंदाज चुकीचे ठरले

आज (३० ऑक्टोबर) रोजी हर्षित राणा वानखेडे मैदानावर नेटमध्ये सराव करताना पहायला मिळाला. पण, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने राणा आगामी बॉर्डर-गावस्कर ट्र्रॉफी स्पर्धेसाठी तयारी करत असल्याचे सांगितले. त्यामुळे राणा ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत पदार्पण करताना पाहायला मिळू शकतो. त्याच्या संघातील प्रवेशामुळे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या संघातील स्थानाला धोका निर्माण झाला आहे. राणा न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा भाग नसेल यावर गंभीरने शिक्कामोर्तब केले आहे.

harshit Rana
IND vs NZ 3rd Test : मोठी बातमी! भारतीय संघात बदल; Jasprit Bumrah च्या मदतीला दिल्लीच्या गोलंदाजाला बोलावले

न्यूझीलंडविरुद्धचा भारतीय संघ :

रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, हर्षित राणा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.