Gautam Gambhir : सुट्टीवर जाताय, परत याल तेव्हा...! गौतम गंभीरचा युवा खेळाडूंना सज्जड दम, हार्दिकलाही ऐकावेच लागेल

भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेवर कब्जा केला.
Gautam Gambhir
Gautam Gambhirsakal
Updated on

India vs Sri Lanka T20 and ODI Series : भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेवर कब्जा केला. गौतम गंभीरच्या कार्यकाळातील ही पहिलीच मालिका होती. आता दोन ऑगस्टपासून वनडे मालिका खेळवली जाणार आहे. जिथे अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि वनडे कर्णधार रोहित शर्मा देखील संघात परतणार आहेत.

दरम्यान भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक गौतम गंभीरने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत न खेळणाऱ्या खेळाडूंना चांगलाच दम दिला आहे. टी-20 मालिका जिंकल्यानंतर गौतम गंभीर म्हणाला की, जे खेळाडू एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळत नाहीत ते दीर्घ विश्रांतीवर असतील आणि त्यामुळे त्यांचा फिटनेस चांगला राहील याची काळजी घ्यावी लागेल.

Gautam Gambhir
IPL 2025 Auction - MS Dhoni, रोहित शर्मा यांच्या भविष्याचा आज फैसला! ५ मुद्यांवर BCCI अन् फ्रँचाझींमध्ये होणार मॅरेथॉन चर्चा

टी-20 मालिका विजयानंतर गौतम गंभीर म्हणाला की, आता काही खेळाडू जे 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये संघासोबत नसतील त्यांना दीर्घ विश्रांती मिळेल. म्हणूनच त्यांनी हे लक्षात ठेवावे लागेल की जेव्हा तो बांगलादेश मालिकेसाठी टीम इंडियामध्ये सामील होईल तेव्हा त्याचे कौशल्य आणि फिटनेस उच्च पातळीवर असले पाहिजे.

Gautam Gambhir
IND vs SL 3rd T20I - SuryaKumar Yadav ची चूक अन् सामना Super Over मध्ये गेला; कॅप्टन गोंधळला, Video

टी-20 टीमच्या स्पेशालिस्ट खेळाडूंना आता ऑक्टोबरमध्ये पुढील मालिका खेळायची आहे. बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून 10 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधी, टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात 19 आणि 27 सप्टेंबर रोजी दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे, ज्यामध्ये सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवी बिश्नोई आणि संजू सॅमसन खेळणार नाहीत. एवढ्या मोठ्या विश्रांतीमुळे गौतम गंभीरने खेळाडूंना फिटनेसवर काम करण्यासाठी सांगितले आहे.

Gautam Gambhir
IND vs SL : संपूर्ण सिरिजमध्ये फ्लॉप तरी गंभीरच्या लाडक्या शिष्याने जिंकलं मेडल! काय घडलं नेमकं?

टी-20 मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघाला 2 ऑगस्टपासून श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीही खेळताना दिसणार आहेत. या दिग्गज खेळाडूंचा ताळमेळ गंभीरसोबत कसा आहे हे पाहणेही रंजक ठरणार आहे.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रायन पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.