Gautam Gambhir on Virat Kohli: ''TRP साठी चांगलं आहे...!'' विराटसोबतच्या नात्यावर गौतमचं रोखठोक उत्तर

Gautam Gambhir bold Reply In Press Conference: श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी गौतम गंभीर याची पत्रकार परिषद दमदार राहिली.. यावेळी मुख्य प्रशिक्षकाने सर्व प्रश्नांवर सडेतोड उत्तर दिले
GautamGambhir relation with virat kohli
GautamGambhir relation with virat kohlisakal
Updated on

Gautam Gambhir Press Conference Live: गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया आज श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. ३ ट्वेंटी-२० व ३ वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी BCCI ने संघ जाहीर केले आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. २०२६चा वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला गेला आहे. तेच रोहित शर्मा व विराट कोहली हे दोन्ही सीनियर खेळाडू वन डे मालिकेसाठी उपलब्ध आहेत. याचवेळी गौतम गंभीर व विराट यांच्यातील नात्यावर चर्चा रंगतेय.

गौतम गंभीर व विराट कोहली हे दोघंही दिल्लीचे आहेत. या दोघांमध्ये इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अनेकदा बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना गौतम गंभीर RCB च्या विराटसोबत भिडला होता. तेच लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शन असतानाही गंभीरने RCBच्या विराटवर शाब्दिक टीका केली होती. त्यामुळे टीम इंडियात गौतम गंभीर पर्व सुरू होत असताना विराटसोबतच्या त्याच्या नात्यावर चर्चा होणे साहजिक आहे.

GautamGambhir relation with virat kohli
Gautam Gambhir Press Conference: हार्दिक पांड्याला कर्णधार का नाही केलं? अजित आगरकरनं स्पष्ट सांगितलं

गौतम गंभीर म्हणाला,"TRPसाठी या चर्चा चांगल्या आहेत, पण मी माझे नाते सार्वजनिक करत नाही. विराट कोहलीसोबत माझे नाते कसे आहे, याबाबत मी एकच सांगेन की आम्ही दोघंही प्रगल्भ आहोत. मैदानावर प्रत्येकाला स्वत:च्या जर्सीसाठी लढण्याचा आणि ड्रेसिंग रूममध्ये विजयासह परत येण्याचा अधिकार आहे. पण, या क्षणी आम्ही भारताचे प्रतिनिधित्व करत आहोत, १४० कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करत आहोत आणि मला खात्री आहे की आम्ही एकच उद्देश घेऊन मैदानावर उतरणार आहोत. मैदानाबाहेर आमचं नातं चांगलंच आहे आणि तसेच ते कायम राहिल.''

"मी त्याच्याशी खूप गप्पा मारल्या आहेत. आम्ही मॅसेज शेअर केले आहेत. आम्ही काय चर्चा केली, मी त्याच्याशी किती गप्पा मारल्या, हे महत्त्वाचे नाही. मी मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतरत किंवा होण्यापूर्वी किंवा सामन्यादरम्यान, तुम्हाल हेडलाइन्स हवी आहे. हे सध्या महत्त्वाचे नाही, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दोघेही भारताला अभिमान वाटावा यासाठी खूप मेहनत घेणार आहोत,''असे गंभीरने स्पष्ट केले.

GautamGambhir relation with virat kohli
Gautam Gambhir Press Conference: रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्ड कप खेळतील का? गौतमचं 'गंभीर' विधान

भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलिल अहमद, हर्षित राणा.

भारताचा ट्वेंटी-२० संघ - सूर्यकुमार यादव ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.