Gautam Gambhir Press Conference: हार्दिक पांड्याला कर्णधार का नाही केलं? अजित आगरकरनं स्पष्ट सांगितलं

Gautam Gambhir & Ajit Agarkar Press Conference Live: गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाचा पहिला दौरा हा श्रीलकेचा असणार आहे. श्रीलंकेत होणाऱ्या ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी निवडलेल्या संघावरून बरीच चर्चा रंगलेली आहे.
Chief Selector Ajit Agarkar on Hardik Pandya
Chief Selector Ajit Agarkar on Hardik Pandyasakal
Updated on

Gautam Gambhir Press Conference Live: गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाचा पहिला दौरा हा श्रीलकेचा असणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षकपद सोडले आणि BCCI ने गौतमची निवड केली. गौतमच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. भारतीय संघ आज श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे आणि त्यापूर्वी गौतम व निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

३ वन डे व ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी निवडलेल्या संघावरून बरीच चर्चा रंगलेली आहे. रोहित शर्माने ट्वेंटी-२०तू निवृत्ती घेतल्यावर उप कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) भारतीय संघाचा कर्णधार होणे अपेक्षित होते. पण, गौतम गंभीर व आगरकर यांनी सूर्यकुमार यादवच्या नावाची घोषणा केली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. हार्दिकला नेमकं कोणत्या कारणामुळे कर्णधारपद दिले गेले नाही, हे स्पष्ट होत नव्हते. पण, आज पत्रकार परिषदेत अजित आगरकर यांनी त्यामागचं खरं कारण सांगितले.

Chief Selector Ajit Agarkar on Hardik Pandya
Ravindra Jadeja च्या कारकीर्दिबाबत मोठे अपडेट्स, दोन कारणं ज्यामुळे त्याला वन डे संघात नाही घेतले

आगरकरने स्पष्ट सांगितले की...

''हार्दिक पांड्या हा आजही संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. पण, त्याची तंदुरुस्ती ही चिंतेची बाब आहे आणि ते त्याच्यासमोरील आव्हान आहे. त्यामुळेच प्रशिक्षक आणि निवड समितीला त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देणं अवघड झाले असते. आम्हाला असा कर्णधार निवडायचा होता, ज्याची तंदुरुस्ती या प्रवासात चिंतेची बाबत असता कामा नये. त्यामुळेच सूर्यकुमारची निवड केली गेली आणि त्याच्याकडे नेतृत्व कौशल्य आहे,''असे आगरकरने स्पष्ट केले.

आगरकर पुढे म्हणाला,'या निर्णयाने हार्दिक पांड्यावरील वर्क लोड चांगल्या पद्धतीने हाताळता येईल, असे आम्हाला वाटते. त्याला वर्ल्ड कप स्पर्धेत फलंदाजी व गोलंदाजी करताना आपण पाहिले आहे. आम्ही खेळाडूंसोबत त्यांच्या बदललेल्या जबाबदारीबद्दल चर्चा करतो आणि तशी चर्चा आम्ही हार्दिकसोबतही केली.''

भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलिल अहमद, हर्षित राणा.

भारताचा ट्वेंटी-२० संघ - सूर्यकुमार यादव ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, मोहम्मद सिराज.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.