Gautam Gambhir: 'मला हेडलाईन द्यायची नाही, मी...', सर्वोत्तम कर्णधाराच्या प्रश्नावर गंभीरनं दिलं स्पष्ट उत्तर

Gautam Gambhir: गौतम गंभीरने त्याच्यासाठी सर्वोत्तम कर्णधार कोण होतं, या प्रश्नाचं काय उत्तर दिलं आहे, जाणून घ्या.
Gautam Gambhir
Gautam GambhirSakal
Updated on

Gautam Gambhir on Best Captain: भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर सध्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. तो सध्या राहुल द्रविडनंतर भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याचाही प्रबळ दावेदार आहे.

दरम्यान, त्याने त्याच्या कारकि‍र्दीत एमएस धोनी, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली आणि अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वात बरेच क्रिकेट खेळला. दरम्यान, याच विषयाला धरून त्याला कोलकाता येथे झालेल्या राईज टू लीडरशीप या कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला की त्याच्यासाठी सर्वोत्तम कर्णधार कोण ठरले.

Gautam Gambhir
T20 World Cup: अन् तिथेच इंग्लंडने मॅच गमावली, पाहा द. आफ्रिकेच्या कर्णधाराने मागे पळत येत पकडलेला अविश्वसनीय कॅच

यावर उत्तर देताना गंभीरने कोणा एकाचे नाव न घेता सर्वांचेच कौतुक केले. तो म्हणाला, 'हा एक वादग्रस्त प्रश्न आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर मला हेडलाईन देण्याची इच्छा नाही. प्रत्येकाची वेगळी ताकद आणि कमजोरी असते.'

'मी द्रविडच्या नेतृत्वात कसोटी आणि गांगुलीच्या नेतृत्वात वनडेत पदार्पण केले. मी कुंबळेच्या नेतृत्वात सर्वोत्तम कामगिरी केली आणि मी एमएस धोनीच्याही नेतृत्वात खेळलो. मी सर्वाधिक काळ धोनीच्या नेतृत्वात खेळलो आणि मला त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यात मजाही आली. त्याने संघाचं चांगलं नेतृत्व केलं.'

गंभीरने धोनीच्या नेतृत्वात खेळताना 2007 टी20 वर्ल्ड कप आणि 2011 वनडे वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाचा वाटाही उचलला.

दरम्यान, गंभीरने या कार्यक्रमादरम्यान मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन नवीन चेंडू वापरण्याच्या नियमावरही टीका केली आहे.

Gautam Gambhir
T20 World Cup: भारत-बांगलादेश संघात सुपर-8 ची महत्त्वाची लढत! हेड-टू-हेड रेकॉर्ड अन् हवामान, जाणून घ्या सर्व डिटेल्स

गंभीर होणार भारताचा प्रशिक्षक?

भारताचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक द्रविडचा कार्यकाळ जूनच्या अखेरीस संपणार आहे. त्याचमुळे बीसीसीआय लवकरच नवीन प्रशिक्षकाची घोषणा करणार आहे. यासाठी उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्याचे समजले असून या पदासाठी गंभीरचे नाव आघाडीवर आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार गंभीरने मुलाखतही चांगली दिली आहे.

बीसीसीआयने दिलेल्या वृत्तानुसार नव्या प्रशिक्षकाच्या कार्यकाळ हा साडेतीन वर्षांचा असणार आहे. म्हणजेच डिसेंबर 2027 पर्यंत या प्रशिक्षकाचा कार्यकाळ असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.