Gautam Gambhir : सिनिअर खेळाडू अन् आयसीसी ट्रॉफी... गौतम गंभीरला मुलाखतीवेळी विचारण्यात आले तीन अवघड प्रश्न

Gautam Gambhir Head Coach : गौतम गंभीरला मुलाखतीवेळी तीन मुख्य प्रश्व विचारण्यात आले आहेत. गंभीरनं स्वतःच्या देखील मागण्या केल्या आहेत.
Gautam Gambhir
Gautam Gambhir Interviewesakal
Updated on

Gautam Gambhir Interview : भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने नुकतेच मुलाखीती घेतल्या. या मुलाखतीत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर देखील झूम कॉल द्वारे सामील झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम गंभीर हा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

सुरूवातीला गंभीर हा एकटाच दावेदार आहे असं चित्र उभं राहिलं होतं. मात्र व्हीवी रमन यांनी देखील जबरदस्त प्रेझेंटेशन देऊन स्पर्धा वाढवली. दरम्यान, क्रिकेट सल्लागार समितीने गौतम गंभीर आणि व्हीवी रमन यांना प्रमुख तीन प्रश्न विचारण्यात आले होते.

Gautam Gambhir
Marcus Stoinis : मार्कस स्टॉयनिसने मोहम्मद नबीचं अव्वल स्थान हिसकावलं; टी 20 अष्टपैलू रँकिंगमध्ये झाले मोठे बदल

मुलाखतीत विचारण्यात आलेले तीन प्रश्न

1 - संघाच्या कोचिंग स्टाफबद्दल आपलं मत काय आहे?

2 - बॅटिंग आणि बॉलिंग विभागातील वयस्कर खेळाडूंना रिप्लेस करण्याबाबत तुमच्याकडे काय प्लॅन आहे?

3 - वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळा कर्णधार, वर्कलोड मॅनेजमेंटसाठी फिटनेसचे निकष याबाबत मत आणि आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात आलेलं अपयश याचं काय कराण असू शकतं.

गंभीरसाठी मुलाखत म्हणजे औपचारिकता?

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्यापूर्वीच गौतम गंभीरची निवड पक्की समजली जात होती. तो आयपीएल 2024 मध्ये केकेआरचा मेंटॉर होता. याच हंगामात केकेआरने 10 वर्षांनी आयपीएल विजेतेपद पटकावलं. यानंतरच राहुल द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून गौतम गंभीरचं नाव पुढे आलं होतं. गंभीरने क्रिकेट सल्लागार समितीसमोर आपल्या मागण्या देखील ठेवल्या. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी आणि कसोटी क्रिकेटसाठी वेगवेगळे संघ असायला हवेत अशी मागणी केली.

Gautam Gambhir
Gautam Gambhir: गौतम गंभीर कोच झाल्यावर बदलणार टीम इंडियाचे चित्र; रोहित-विराटचं भविष्य काय?

रमन यांच्यामुळे चुरशीची स्पर्धा

व्हीवी रमन यांनी मुलाखतीवेळी आपलं दमदार प्रेझेंटेशन सादर करत गंभीरसाठी चांगलीच स्पर्धा निर्माण केली. दरम्यान, रमन यांनी जर गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडला गेला तर त्याला मी शुभेच्छा देणार असे सांगितले. ते म्हणाले की, 'मी गंभीरला आयपीएलमधील एक सर्वश्रेष्ठ कर्णधार मानलं आहे. तो लढवय्या आणि आक्रमक आहे. अनेक प्रयत्नातून त्यानं हे यश मिळवलं आहे. तो क्रिकेटसाठी कटीबद्ध आहे. तसेच तो दुसऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत नाही. जर तो मुख्य प्रशिक्षक झाला तर त्याला मी शुभेच्छाच देईन.'

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.