Gautam Gambhir: 'मी आधीच्या सपोर्ट स्टाफचे...', भारतीय संघाचा हेड कोच झाल्यानंतर गंभीर द्रविडबद्दल काय म्हणाला?

India Cricket Team Coach: गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर त्याने या नव्या जबाबदारीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
Gautam Gambhir | Team India
Gautam Gambhir | Team IndiaSakal
Updated on

Gautam Gambhir on Head Coach Role: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेनंतर राहुल द्रविडचा भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला.

या स्पर्धेनंतर त्याच्यासह फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांचाही कार्यकाळ संपला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने ही स्पर्धा जिंकली होती.

यानंतर आता मंगळवारी बीसीसीआयने माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला भारतीय संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले.

Gautam Gambhir | Team India
Gautam Gambhir Coach: गौतम गंभीरचा कार्यकाळ किती असणार अन् सूत्र केव्हा हाती घेणार? जाणून घ्या अपडेट्स

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सर्वात आधी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. त्यांनी या पदासाठी त्याला सर्वोत्तम पात्र असलेला व्यक्ती म्हटलं आहे.

दरम्यान, ही निवड झाल्यानंतर बीसीसीआयकडे गंभीरने आपली प्रतिक्रियाही दिली आहे. त्याने म्हटले आहे की देशाची सेवा करणे सन्मानाची गोष्ट आहे. याशिवाय त्याने द्रविडाचेही अभिनंदन केले.

द्रविडने म्हटले, 'माझ्या तिरंग्याची, नागरिकांची आणि देशाची सेवा करण्याची संधी मिळणे मी माझा सन्मान समजतो. मी राहुल द्रविड आणि त्याची सपोर्ट स्टाफची टीमचे अभिनंदत करतो. त्यांनी संघासह मोठं यश मिळवले. मी भारतीय संघाचा प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी उत्सुक आहे आणि हा सन्मान आहे.'

Gautam Gambhir | Team India
Gautam Gambhir : गंभीरच्या कार्यकाळात टीम इंडियाला 5 ICC ट्रॉफी जिंकण्याची संधी, जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल

तो पुढे म्हणाला, 'खेळत असताना भारतीय संघाची जर्सी परिधान करणे माझ्यासाठी नेहमीच अभिमानाची गोष्ट होती. मी जेव्हा नवीन भूमिका स्विकारेल, तेव्हाही ही भावना बदललेली नसेल.'

'क्रिकेट हे माझे पॅशन आहे आणि मी बीसीसीआय, क्रिकेट प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सपोर्ट स्टाफ आणि सर्वात महत्त्वाचे खेळाडू यांच्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहे. आशा आहे की आम्ही आगामी स्पर्धांमध्ये यश मिळवू.'

गंभीरचा कार्यकाळ साडेतीन वर्षांचा असणार आहे. तो डिसेंबर २०२७ पर्यंत या पदावर राहणार असून या काळात भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५, टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५, टी२० वर्ल्ड कप २०२६, वनडे वर्ल्ड कप २०२७,टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२६ या महत्त्वाच्या आयसीसी स्पर्धा खेळायच्या आहेत.

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.