Gautam Gambhir : 'गंभीर टिकणार नाही कारण...' भारताला टी-20 चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूच्या वक्तव्याने उडाली खळबळ

भारताला पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दिग्गज खेळाडूने गौतम गंभीरवर मोठे वक्तव्य केले आहे.
Joginder Sharma on Gautam Gambhir
Joginder Sharma on Gautam Gambhirsakal
Updated on

Joginder Sharma on Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघात आता गौतम गंभीरचे युग सुरू झाले आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतून ही जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, भारताला पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा माजी वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्माने मोठे वक्तव्य केले आहे.

Joginder Sharma on Gautam Gambhir
IND vs SL 2nd ODI : भारताच्या प्लेइंग-11मध्ये होणार बदल? गंभीर-रोहित घेणार मोठा निर्णय, 'या' खेळाडूला संधी देणार

गौतम गंभीरसोबत 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपचा भाग असलेल्या जोगिंदरने सांगितले की, गंभीर मुख्य प्रशिक्षक बनला आहे, परंतु तो या पदावर जास्त काळ राहणार नाही. यामागे माजी भारतीय खेळाडूने यामागे मोठी कारणे दिली आहेत.

2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर बीसीसीआयने गौतम गंभीरला टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्याचा निर्णय घेतला. बऱ्याच दिवसांपासून या भूमिकेसाठी त्यांची निवड झाल्याचे मानले जात होते, मात्र आता जोगिंदर शर्मा यांच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

Joginder Sharma on Gautam Gambhir
Olympics 2024 Badminton Live : लक्ष्य सेन ऑलिम्पिकमध्ये जिंकणार मेडल? `सुपर डेन’ विक्टर एक्सेलसेनशी सामना, जाणून घ्या कोण आहे कोणावर भारी...

जोगिंदर शर्मा यांनी एका पॉडकास्टवर संवाद साधताना हे मोठे विधान केले आहे. तो म्हणाला की, "गौतम गंभीरचे निर्णय कधीकधी असे असतात की इतरांना ते आवडत नाहीत. तो सरळ बोलणारा माणूस आहे. कोणाकडे जाणार नाही, तो खुशामत करणारा नाही. माझ्या माहितीनुसार तो फक्त त्याचे काम करतो.”

Joginder Sharma on Gautam Gambhir
IND vs SL : कर्णधार टेन्शनमध्ये! दुसऱ्या ODI सामन्यापूर्वीच संघाला मोठा धक्का! मॅच विनर खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर

भारत-श्रीलंका मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, गौतम गंभीरचा प्रवास विजयाने सुरू झाला आहे. टी-20 मालिकेत भारताने श्रीलंकेचा 3-0 असा पराभव केला. वनडे मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. आज कोलंबोमध्ये उभय संघांमध्ये दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.