Gautam Gambhir World XI: गौतम गंभीरच्या संघात पाकिस्तानच्या ३ खेळाडूंना स्थान; नावं वाचून व्हाल हैराण

Gautam Gambhir All Time World XI: भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने त्याच्या ऑल टाईम वर्ल्ड प्लेइंग इलेव्हन संघ जाहीर केला.
Gautam Gambhir World XI
Gautam Gambhir World XIesakal
Updated on

three Pakistani & Australian player in Gautam Gambhir World XI: भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने त्याचा जागतिक एकादश संघ जाहीर केला आहे. नुकतेच दिनेश कार्तिकने त्याची ऑल टाईम टीम इंडिया जाहीर केली होती. त्यात महेंद्रसिंग धोनी, कपिल देव या वर्ल्ड कप विजेत्या कर्णधारांना स्थान मिळालेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले गेला. त्यात गंभीरच्या जागतिक एकादश संघात तीन पाकिस्तानी खेळाडूंना स्थान मिळाल्याने सर्वांना आश्चर्य वाटले आहे.

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या संघात प्रत्येकी ३ पाकिस्तानी आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत. दक्षिण आफ्रिकेचे २ आणि श्रीलंका, वेस्ट इंडिज व इंग्लंडच्या प्रत्येकी १ खेळाडूचा समावेश केला आहे. स्पोर्ट्सकीडा वेबसाईटवर झालेल्या चर्चेत गौतमने त्याचा जागतिक एकादश संघ निवडला.

Gautam Gambhir World XI
IPL 2025 Auction: राहुलचा लेक, Samit Dravid आयपीएल २०२५ खेळणार? पात्रता निकष काय आहेत ते घ्या जाणून

गंभीरने त्याच्या संघात सर्वप्रथम ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक-फलंदाज ॲडम गिलख्रिस्टचे नाव घेतले. यानंतर त्याच्या यादीत मॅथ्यू हेडन आणि अँड्र्यू सायमंड्स आहेत. यानंतर गंभीरने पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक, अब्दुल रझाक आणि शोएब अख्तर यांची निवड केली. दक्षिण आफ्रिकेच्या मॉर्ने मॉर्केल आणि एबी डिव्हिलियर्स यांना त्याने संघात स्थान दिले. मॉर्ने मॉर्केल हा गौतमसह टीम इंडियात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत आहे.

भारतासाठी दोन वर्ल्ड कप विजेतेपद पटकावणाऱ्या गंभीरने आपल्या संघात श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन, इंग्लंडचा अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा यांची निवड केली आहे.

Gautam Gambhir World XI
Rashid Khan: 6,6,6,6,6,6; राशिद खानची तुफान फटकेबाजी, ट्वेंटी-२०त झळकावले वेगवान अर्धशतक, Video

गौतम गंभीरची ऑल टाइम वर्ल्ड इलेव्हन: ॲडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया), मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया), एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका), ब्रायन लारा (वेस्ट इंडिज), अँड्र्यू सायमंड्स (ऑस्ट्रेलिया), इंझमाम-उल-हक (पाकिस्तान), अब्दुल रझाक (पाकिस्तान), मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) ), शोएब अख्तर (पाकिस्तान), मोर्ने मॉर्केल (दक्षिण आफ्रिका), अँड्र्यू फ्लिंटॉफ (इंग्लंड).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.