Virender Sehwag: 'संघात फक्त सेहवागचीच मनमानी होती, त्याने मला...', मॅक्सवेलने पंजाब किंग्स संघातील वातावरणाची केली पोलखोल

Glenn Maxwell on Virender Sehwag Toxic Behavior: ग्लेन मॅक्सवेलने त्याच्या पुस्तकात पंजाब किंग्सकडून आयपीएलमध्ये खेळण्याच्या कडू-गोड अनुभवांबद्दल लिहिलं असून त्याने २०१७ हंगामात सेहवागने त्याच्याची मनमानी कशी केली होती, याबाबत खळबळजन दावाही केला आहे.
Glenn Maxwell - Virender Sehwag
Glenn Maxwell - Virender SehwagSakal
Updated on

Glenn Maxwell on Virender Sehwag: ग्लेन मॅक्सवेल गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएल खेळत आहे. सध्या तो रॉयल चॅलेजर्स बंगळुरू संघाचा भाग असला, तरी त्याआधी तो काही वर्षे पंजाब किंग्स संघासाठी खेळला आहे. पंजाबचा तो कर्णधारही राहिला आहे.

मात्र, त्याच्यासाठी पंजाबकडून खेळण्याचा अनुभव कडू-गोड आठवणींचा राहिला आहे. याचबद्दल त्याने आता त्याच्या 'द शोमॅन' या पुस्तकात खुलासा केला आहे. त्याने यात अनेक खळबळजनक दावे केले आहेत. तसेच भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेगवागच्या वागणुकीबाबतही खळबळजनक दावा केला आहे.

मॅक्सवेलने सेहवागसह संघसहकारी म्हणून २०१४ मध्ये खेळण्याचा अनुभवही लिहिला आहे. त्याने यात लिहिलंय की फक्त तीन सामने गमावल्यानंतर पंजाब फायनलमध्ये पोहचला होता, त्याने या हंगामात ५५२ धावा केल्या होत्या. तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. सेहवागही या संघात होता.

पण तो म्हणाला की शेवटच्या षटकात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पंजाब संघ हरला. त्यानंतर फ्रँचायझीकडून त्याला सांगण्यात आले होते की आता संघ त्याच्या भोवती बांधला जाईल. पण नंतरचे दोन हंगाम चांगले गेले नाहीत. त्याच्याकडूनही चांगली कामगिरी झाली नसल्याचे त्याने म्हटले. त्यानंतर युवा खेळाडू म्हणून त्याला सर्व सांभाळणे कठीण गेले.

Glenn Maxwell - Virender Sehwag
Glenn Maxwell : "कदाचित आता वेळ आली..." RCB च्या खराब कामगिरीनंतर मॅक्सवेलने उचलले मोठं पाऊल!
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.