Arjun Tendulkar Ranji Trophy : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चं ऑक्शन तोंडावर आलं आहे आणि प्रत्येक खेळाडू आपला भाव वाढवण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमधून छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबई इंडियन्सने लिलावात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या व तिलक वर्मा यांना आपल्या ताफ्यात कायम ठेवले. मागील दोन पर्वात मुंबई इंडियन्सने सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला आपल्या ताफ्यात घेतले. यंदाच्या पर्वात त्याला MI पुन्हा घेईल का की तो दुसऱ्या फ्रँचायझीकडून खेळताना दिसेल, याची उत्सुकता आहे.