Ben Stokes: बेन स्टोक्सला पुन्हा दुखापत, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून माघार

England Cricket Test Team Captain : इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याला दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.
Ben stokes injury
Ben stokes injuryesakal
Updated on

England vs Sri Lanka Ben Stokes Injury : इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने श्रीलंकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या अनुपस्थितीत ऑली पोप हा घरच्या मैदानावर होणाऱ्या कसोटी मालिकेत इंग्लंडचे नेतृत्व करणार आहे.

स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने मागील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका ३-० अशी जिंकली. दी हंड्रेड लीगमध्ये स्टोक्सला दुखापत झाली. इंग्लंड आणि वेस्ल क्रिकेट बोर्डाने ( ECB) जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले की,डाव्या मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे बेन स्टोक्सला आगामी मालिकेतून माघार घ्यावी लागत आहे. दी हंड्रेड लीगमध्ये नॉर्थन सुपरचार्जर्सकडून खेळताना रविवारी त्याला ही दुखापत झाली.''

Ben stokes injury
Big News : टीम इंडियाच्या वेळापत्रकात मोठा बदल; BCCI च्या अपडेट्सने क्रिकेटप्रेमींचा उडाला गोंधळ

''मंगळवारी लीड्समध्ये केलेल्या स्कॅनमध्ये त्याची दुखापत गंभीर असल्याचे जाणवले. त्यामुळे त्याला २१ ऑगस्टपासून एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला मुकावे लागणार आहे. संघात अतिरिक्त बदल केला जाणार नाही,''असेही निवेदनात म्हटले गेले आहे.

स्टोक्स ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतून पुनरागमनासाठी प्रयत्नशील असणार आहे. “ऑक्टोबरच्या सुरुवातीला इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यावर परतण्याचे अष्टपैलू खेळाडूचे लक्ष्य आहे. या दौऱ्यात मुलतान, कराची आणि रावळपिंडी येथे कसोटी सामने खेळवले जाणारर आहेत. स्टोकच्या अनुपस्थितीत इंग्लंडचा फलंदाज ऑली पोप संघाचे नेतृत्व करेल,” असे म्हटले आहे.

Ben stokes injury
तमिळनाडूतील बुची बाबू क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघातून श्रेयस अय्यर; तर झारखंड संघातून इशान किशन खेळणार

England vs Sri Lanka यांच्यातील पहिली कसोटी २१ ऑगस्टपासून मँचेस्टर येथे खेळवली जाईल. त्यानंतर लॉर्ड्सवर दुसरी कसोटी २९ ऑगस्टला आणि तिसरी कसोटी ६ सप्टेंबरला ओव्हल येथे होईल. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ ट्वेंटी-२० व पाच वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. त्यानंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर ३ कसोटी खेळण्यासाठी जाईल. या दौऱ्यावरील पहिली कसोटी ७-११ ऑक्टोबर मुलतान येथे होईल. दुसरी कसोटी १५ ते १९ ऑक्टोबरला कराची येथे खेळवण्यात येईल आणि तिसरी कसोटी रावळपिंडी स्टेडियमवर २४ ते २८ ऑक्टोबरला होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.