Hanuma Vihari : आता परिस्थिती बदलली... राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करणाऱ्या विहारीला निकालानंतर लगेच मिळली NOC?

Hanuma Vihari Andhra Pradesh : हनुमा विहारीचा रणजी ट्रॉफी हंगामादरम्यान आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनशी वाद झाला होता.
Hanuma Vihari
Hanuma Vihari No Objection Certificate esakal
Updated on

Hanuma Vihari No Objection Certificate : भारताचा कसोटी फलंदाज हनुमा विहारीचा आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनशी वाद झाला होता. जाहिररित्या झालेल्या वादावर अखेर तीन महिन्यानंतर पडदा पडला आहे. आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनने त्याला ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे. आता तो दुसऱ्या राज्याकडून क्रिकेट खेळू शकतो. तीन महिन्यापूर्वी त्याचा संघातील खेळाडू आणि संघटनेतील अधिकाऱ्यांसोबत वाद झाला होता.

Hanuma Vihari
T20 World Cup 2024: भारत-आयर्लंड न्युयॉर्कमध्ये येणार आमने-सामने; कधी अन् कसा पाहाणार सामना, जाणून घ्या एका क्लिकवर

हनुमा विहारीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. तो म्हणाला की, 'मी गेल्या दोन महिन्यापासून ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करत होता. चारवेळा यांना मेल केला. त्यांनी मला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं नाही. आता हास्यास्पदरित्या परिस्थिती बदलली असून त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र त्वरित दिलं आहे.'

Hanuma Vihari
T20 World Cup: पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा जोरदार सराव, विराटनेही गाळला घाम; BCCI ने शेअर केला Video

हनुमा विहारी आंध्र प्रदेशचा कर्णधार असताना त्याचा वाद झाल्यानंतर संघटनेने रणजी हंगामाचा एकच सामना झाला असताना त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं होतं. त्यानंतर हनुमा विहारीने आंध्र प्रेदश क्रिकेट संघटनेत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला होता.

त्यानं त्यानंतर कर्णधारपदाचा राजीनामाच दिला होता. त्यानंतर संघटनेनं त्याला कारणे दाखवा नोटिस बजावली होती. मात्र विराहीने संघटनेकडे एनओसीची मागणी केली.

विहारी आता कोणत्या संघाकडून खेळणार हे अजून गुलदस्त्यात आहे. मात्र त्याची गुणवत्ता आणि अनुभव पाहता त्याच्यासाठी अनेक राज्यांनी पायघड्या घातल्या तर नवल वाटायला नको. तो तांत्रिक दृष्ट्या दर्जेदार फलंदाज आहे. त्याने 16 कसोटी सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.