Virat Kohli Family: भारतीय माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू विराट कोहलीचा आज ३६ वा वाढदिवस. ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्ली येथे विराटचा जन्म झाला. अनेक विक्रम नावावर असणाऱ्या विराटच्या कारकिर्दिबद्दल आपण सर्वच जाणतो. म्हणूनच त्याच्या वाढदिवशी आपण त्याचा कुटुंबाबद्दल जाणून घेऊयात. विराट एक आंतरराष्ट्रीय पातळीवर नामांकित क्रिकेटपटू असून त्याचे नाव दिग्गजांमध्ये घेतले जाते. विराट भारतातील श्रीमंत व सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू व विराटचे कुटुंबही श्रीमंत आहे.
विराटचे वडील प्रेमनाथ कोहली वकील होते, २००६ साली ते स्वर्गवासी झाले. तर आई सरोज कोहली गृहीणी. विराटला एक मोठा भाऊ व एक बहीण आहे.
विराटचा मोठा भाऊ विकास कोहली एक व्यवसायिक आहे. त्याचबरोबर तो विराट कोहलीचा मॅनेजर देखील आहे. विराटची बहीण भावना धिंग्रा देखील व्यवसायिक आहे. ती विराटच्या 'वन-८ सिलेक्ट' ब्रॅंडची मुख्य सदस्य आहे. त्याचबरोबर ती पतीच्या व्यवसायातही लक्ष देते.
विकासच्या कुटुंबात विकासची पत्नी व त्यांना एक मुलगा आहे. विकासच्या पत्नीचे म्हणजेच विराटच्या वहिनीचे नाव चेतना आहे. तर मुलाचे नाव आरव आहे. विराटच्या बहिणीचा पती व्यवसायिक आहे. तर त्यांना आयुष व महक नावाची दोन मुले आहेत.
विराट आणि अनुष्काची जोडी तर सर्वश्रुत आहे. ते २०१७ साली लग्नबंधनात अडकले. अनुष्का पेशाने अभिनेत्री आहे. त्यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. मुलगी वामिका, तिचा जन्म २०२१ मध्ये विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना झाला. त्यावेळी विराट बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेला रामराम करत मायदेशी परतला होता. विराटच्या मुलाचा (आकाय) जन्म याच वर्षी (२०२४) फेब्रुवारीमध्ये झाला. मातृत्वाच्या जबाबदरीत अडकल्यानंतर अनुष्का अभिनय क्षेत्रापासून दूर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.