Gautam Gambhir: 'गौतम तुझा आक्रमकपणा...', हरभजनच्या भारताचा कोच झालेल्या गंभीरला खास शुभेच्छा

Team India Coach: भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक झाल्याबद्दल गौतम गंभीरला हरभजन सिंगने खास शुभेच्छा दिल्या आहेत.
Harbhajan Singh | Gautam Gambhir
Harbhajan Singh | Gautam GambhirSakal
Updated on

Harbhajan Singh Wishes to Gautam Gambhir: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेनंतर राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यावर भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळीस गौतम गंभीर भारतीय संघाचा 25 वा प्रमुख प्रशिक्षक ठरला.

याआधी त्याने इंडियन प्रीमीयर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन टीमसाठी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले आहे. प्रशिक्षकपद मिळाल्यानंतर जगभरातील तमाम क्रिकेटपटूंनी त्यांना शुभेच्छा दिल्या. हरभजन सिंहने सांगितले की, गौतमचा आक्रमकपणा खेळाडूंना यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी फायद्याचे ठरेल.

Harbhajan Singh | Gautam Gambhir
Gautam Gambhir Coach: गौतम गंभीरचा कार्यकाळ किती असणार अन् सूत्र केव्हा हाती घेणार? जाणून घ्या अपडेट्स

एक्सवर (ट्वीटर) पोस्ट शेअर करत हरभजन म्हणाला, “प्रशिक्षकपदाच्या नवीन खेळीसाठी गौतम तुला खूप शुभेच्छा. मला विश्वास आहे की, तुझा अनुभव, आक्रमकपणा, उर्जा, एकाग्रता, आणि प्रतिभा टीमसाठी खूप फायदेशीर ठरेल आणि टीमला पुढे घेऊन जातील. माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा”.

गंभीरने प्रशिक्षकपद भेटल्यानंतर आभार व्यक्त केले आहेत. त्यानी सोशल मिडीयावर पोस्टद्वारे सांगितलं, “भारत माझी ओळख आहे आणि तिची सेवा करणं हा माझा सर्वात मोठा सन्मान आहे. ही जबाबदारी वेगळी असली तरी मला संघात परत येऊन खूप अभिमान वाटत आहे. भूमिका जरी वेगळी असली तरी माझं लक्ष्य सदैव एकच असणार आहे जे आधीपासून होते की भारताला गौरवान्वित करण्याचे."

गौतम गंभीरने भारताला 2 वर्ल्डकप जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी टी-20 वर्ल्डकप 2007 च्या अंतिम सामन्यात अर्धशतक केले होते आणि वनडे वर्ल्डकप २०११ च्या अंतिम सामन्यात 97 धावांची खेळी खेळली होती. गंभीरचे हे योगदान आजसुद्धा उल्लेखनीय आहे.

कसोटी, वनडे आणि टी-20 इंटरनॅशनल या तिन्ही फॉरमॅट्समध्ये मिळून त्यानी 10,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्यांनी 20 शतके सुद्धा केली आहेत.

Pratima olkha:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.