Badlapur School Case: शिंदे साहेब कठोरातील कठोर कारवाई करा! हरभजन सिंगने दोन दिवसांपूर्वीच केली होती मागणी

Harbhajan Singh Demands strict Action: बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मंगळवारी संतापाची लाट उसळ्याचे दिसले. याच प्रकरणी हरभजन सिंगनेही दोन दिवसांपूर्वीच आवाज उठवला होता.
Harbhajan Singh | Badlapur School Case
Harbhajan Singh | Badlapur School CaseSakal
Updated on

Badlapur School Crime Case: कोलकातामधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असतानाच बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्यांवर सफाई कामगारकडून लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच प्रकरणाबाबत दोन दिवसांपूर्वीच भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने आवाज उठवला होता.

बदलापूरमधील घटनेची बातमी जेव्हा सर्वांसमोर आली होती, त्यानंतर हरभजन सिंगने शनिवारी या घटनेवरील एका बातमीवर प्रतिक्रिया देत पोस्ट केली होती की 'आपल्याबरोबर किती चुकीच्या गोष्टी घडत आहेत. मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महाराष्ट्र पोलिस यांना विनंती करतो की या विकृत बुद्धीच्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.'

Harbhajan Singh | Badlapur School Case
Badlapur School Crime: बदलापूरमध्ये शाळेत ४ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, संतप्त पालकांचा रेलरोको

समोर आलेल्या माहितीनुसार दोन चिमुकल्या मुलींवर २४ वर्षीय अक्षय शिंदे या सफाई कर्मचाऱ्याने १२ आणि १३ ऑगस्ट रोजी लैंगिक आत्याचार केल्याचे समोर आले. हा कर्मचारी १ ऑगस्ट रोजी काँट्रॅक्टवर शाळेत रुजू झाला होता. त्यानंतर त्याने हे घृणास्पद कृत्य केले.

अत्याचार झालेल्या एका मुलीने तिच्या गुप्तांगात वेदना होत असल्याची तक्रार कुटुंबियांकडे केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर दुसऱ्या मुलीच्या पालकांना संपर्क केल्यानंतर त्यांनीही ती मुलगी शाळेत जाण्यास घाबरत असल्याचे सांगितले होते.

यानंतर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर पालकांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. यावेळी पोलिसांकडून गुन्हा नोंदवून घेण्यात दिरंगाई केली जात असल्याचा आरोपही पालकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी रात्री गुन्हा नोंदविला गेल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

Harbhajan Singh | Badlapur School Case
Badlapur School Case: आठ दिवसांपूर्वी झाला होता चिमूरड्यांवर अत्याचार, मुख्याध्यापिका निलंबित; पोलिसांची बदली, बदलापूर प्रकरणातील संपूर्ण Timeline

दरम्यान, बदलापूरमधील हे प्रकरण आता मंगळवारी अधिक पेटल्याचे दिसत आहे. नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी बदलापूरक रेल्वे स्टेशनवर आंदोलन केले. त्यामुळे रेल्वे वाहतुकही विस्कळीत झाल्याचे दिसले.

आंदोलकांकडून आरोपीला त्वरित फाशी द्या अशी मागणी केली जात आहे. आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक झाली. त्यानंतर अखेर पोलिसांनीही आंदोलकांवर लाठी चार्ज केल्याचे दिसले.

दरम्यान, घटनेची चौकशी करण्याची आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचा प्रस्तावही सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.