बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

Harbhajan Singh Reacts On Imane Khelif Medical Report : इमाने खलीफ पुरूष आहे कळताच भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने सुवर्ण पदक परत घेण्याची मागणी ऑलिम्पिक समितीकडे केली आहे.
harbhajan singh
harbhajan singhesakal
Updated on

Harbhajan Singh Reacts On Imane Khelif Medical Report : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या संपूर्ण स्पर्धेदरम्यान अल्जेरियन बॉक्सर इमाने खलीफ चर्चेत राहिली. ती पुरूष असल्याचे अनेकांनी आरोप केले आणि तिच्या स्पर्धेतील पात्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. तरीही ती पात्र ठरली आणि तिने महिलांच्या ६६ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. परंतु आता तीचे वैद्यकीय अहवाल समोर आले आहेत. ज्यामध्ये ती पुरुष असल्याचे स्पष्ट झाले आहे. अहवाल समोर येताच भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटचे १०० ग्रॅम वजन जास्त झाल्यामुळे तिला अंतिम फेरीसाठी अपात्र ठरवण्यात आले. पण पुरूष असूनही महिलांच्या गटात खेळणाऱ्या इमाने खलीफला पात्र ठरवण्यात आले. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेदरम्यान वातावरण आणखी तापले होते. परंतु इमाने खलीफचा वैद्यकिय अहवाल समोर येताच पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. अशातच भारतीय माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने " सुवर्ण पदक परत घ्या" अशी ऑलिम्पिक समितीकडे मागणी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.